Dharmendra Pradhan : महिन्याभरापूर्वीच या ज्योतिष्याने केलेली राजीनाम्याची भविष्यवाणी, धर्मेंद्र प्रधान यांच्या रुपाने त्याचं भविष्य खरं ठरलं
Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा बरोबर 25 जुलै रोजी झाला. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. भविष्यवाणी खरी ठरल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला.आता देशाला नवीन शिक्षण मंत्री मिळाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मागच्या महिन्याभरापासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरु होतं. आता अशी माहिती समोर आलीय की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी 22 जून रोजीच भविष्यवाणी करण्यात आली होती. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशी जोडून लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील भविष्यवेत्याचं नाव सुमीत आचार्य आहे.
25 जुलै आधी केंद्रात एक फारमोठा फेर बदल झालेला तुम्हाला दिसेल. त्या व्यक्तीला पद सोडावं लागेल अशी सुमीतने व्हिडिओमध्ये भविष्यवाणी केली होती. 25 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान रशिया आणि चीनमध्ये भूकंप येईल अशी सुद्धा भविष्यवाणी त्यांनी केली आहे. त्याशिवाय सुमीत आचार्यच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.
भविष्यवाणी खरी ठरल्याची लोकांमध्ये चर्चा
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा बरोबर 25 जुलै रोजी झाला. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. भविष्यवाणी खरी ठरल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. मागच्या एक महिन्यापासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टींचं आंदोलन सुरु होतं. नीट पेपर लीक प्रकरणात जबाबदारी निश्चित करुन देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. अखेर 25 जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
हा केवळ योगायोग आहे
हा व्हिडिओ SHIVA TIWARI या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी तो शेअर सुद्धा केला आहे. लाईक सुद्धा मोठ्या प्रमाणात या व्हिडिओला मिळत आहेत. सोशल मिडिया युजर्स या व्हिडिओबद्दल वेगवेगळ्या Reactions देत आहेत. एका युजरने लिहिलय की, भविष्यवाणी खरी ठरली. आणखी एका युजरने लिहिलं की, पुढची भविष्यवाणी सुद्धा करा. आणखी एका युजरने लिहिलं की, हा केवळ योगायोग आहे, मी भविष्यवाणी मानत नाही.