Congress: राहुल गांधी यांच्या टीममध्ये निर्णय घेणारा सिक्युरीटी गार्ड कोण? गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यात होता उल्लेख

| Updated on: Aug 27, 2022 | 7:52 PM

आझाद यांनी पत्रात ज्यांचा राहुल यांची मंडळी असा उल्लेख केला आहे, त्यात केसी वेणूगोपाल यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. वेणूगोपाल हे राहुल गांधी यांचे नीकटवर्तीय आहेत. 2017 सारली त्यांना सरचिटणीस करण्यात आले होते, त्याच वर्षी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. वेणूगोपाल यांच्यापर्यंत पोहचणे त्यावेळी अवघड मानले जात असे.

Congress: राहुल गांधी यांच्या टीममध्ये निर्णय घेणारा सिक्युरीटी गार्ड कोण? गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यात होता उल्लेख
काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad)यांनी पाच दशकांनंतर पक्ष सोडला आहे. काँग्रेस सोडण्यापूर्वी आझाद यांनी लिहिलेल्या पत्रातील काही प्रश्नांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या पत्रात आझाद यांनी लिहिले होते की, देशातील सर्वात जुना पक्ष आता समग्र रुपात नष्ट झालेला आहे. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व अंतर्गत निवडणुकांच्या नावाने सगळ्यांना धोका देत आहे. त्यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्यावर अपरिपक्व आणि बालिश व्यवहार करीत असल्याचाही आरोप केला आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) या केवळ नाममात्र नेत्या राहिल्या असल्याचे सांगत निर्णय राहुल गांधी करत असल्याचे म्हटले आहे. हे निर्णय राहुल गांधी यांचे स्वीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक करत असल्याचा खळबळजनक आरोपही आझाद यांनी त्यांच्या पत्रात केला आहे.

चमच्यांच्या संरक्षणात सुरु आहे काँग्रेस?

गुलाम नबी आझाद यांच्या पत्रात ज्या सिक्युरिटी गार्डचा उल्लेख करण्यात आला आहे, तो नेमका आहे तरी कोण, त्याच्य़ावर आझाद यांनी का प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या वर्तुळातील नेत्यांवरही आझाद यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या आठ वर्षांत पक्षावर गंभीर नसलेल्या नेतृत्वाला थोपवण्याचा प्रयत्न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असे आझाद यांनी म्हटले आहे. चमच्यांच्या संरक्षणात काँग्रेसची वाटचाल सुरु असल्याचा आरोपही आझाद यांनी केला आहे. ही कोण मंडळी आहेत, हेही जाणून घेऊयात.

राहुल यांच्या सुरक्षेची जबाबदारी बायजू यांच्याकडे

हिंदस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यात सिक्युरिटी गार्ड असा जो उल्लेख करण्यात आला आहे, तो केबी बायजू यांचा असण्याची शक्यता आहे. बायजू हे सुरुवातचीला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये होते. राहुल गांधी हे सरचिटणीस झाल्यानंतर बायजू त्यांच्या टीममध्ये सहभागी झाले. बायजू यांच्याकडे पक्षाचे कोणतेही औपचारिक पद नसतानागी, त्यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले. बायजू हे राहुल गांधी यांच्या सुरक्षेसह इतरही महत्त्वाची कामे पार पाडतात. यात यावर्षीचा गोवा दौराही आहे. बायजू हे भारत जोडो यात्रेचे महत्त्वाचे घटक आहेत.

हे सुद्धा वाचा

राहुल यांचा सेदश घेऊन बायजू कॅप्टन यांच्याकडे गेले होते

राहुल गांधी यांचे दौरे पाहत असल्याने बायजू हे पक्षात पॉवरफुल झाले असल्याचे सांगण्यात येते. राहुल यांच्यासोबत कोणी किती वेळ घालवायचा ह बायजूच ठरवत असल्याची माहिती आहे. राहुल यांच्यासोबत ते व्यासपीठावरही असतात. पंजाबमध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये कलह झाला होता, तेव्हा राहुल गांधी यांचे वैयक्तिक दूत म्हणून बायजू हेच कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याकडे गेले होते. यावरुन त्यांचे पक्षातील महत्त्व लक्षात येऊ शकेल. नंतर कॅप्टन काँग्रेसमधून बाहेर पडले.

वेणूगोपाल आणि इतर अनेक राहुल समर्थकांवर आक्षेप

आझाद यांनी पत्रात ज्यांचा राहुल यांची मंडळी असा उल्लेख केला आहे, त्यात केसी वेणूगोपाल यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. वेणूगोपाल हे राहुल गांधी यांचे नीकटवर्तीय आहेत. 2017 सारली त्यांना सरचिटणीस करण्यात आले होते, त्याच वर्षी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. वेणूगोपाल यांच्यापर्यंत पोहचणे त्यावेळी अवघड मानले जात असे. आझाद यांचे आरोप वेणूगोपाल यांनी फेटाळले आहेत. ज्याप्रमाणे आझाद हे राजीव आणि संजय गांधी यांचे नीकटवर्तीय होते त्याचप्रमाणे राहुल यांच्या टीममध्ये आपण असल्याचे वेणूगोपाल यांनी सांगितलेले आहे. राहुल यांच्या टीममध्ये रणदीपसिंह सुरजेवाला आणि अजय माकन हेही आहेत.