कोण आहे झीशान अहमद? ज्याचा व्हिडिओ पाहून दीपक यादवने पोटच्या मुलीची केली हत्या

गुरुग्राममधील राधिका यादवच्या हत्येची दोन महत्वाची कारणे समोर आली आहेत. राधिका यादवने एका वर्षांपूर्वी झीशान अहमद नावाच्या तरुणासोबत एका व्हिडिओमध्ये काम केले होते. या तरुणावरही दीपक नाराज होते अशी माहितीही समोर आली आहे.

कोण आहे झीशान अहमद? ज्याचा व्हिडिओ पाहून दीपक यादवने पोटच्या मुलीची केली हत्या
jeeshan and radhika
| Updated on: Jul 11, 2025 | 4:44 PM

गुरुग्राममधील राधिका यादवच्या हत्या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा आहे. राधिकाच्या हत्येची दोन महत्वाची कारणे समोर आली आहेत. राधिकाचे वडील दीपक यादव हे तिच्यावर दोन कारणांमुळे नाराज होते अशी माहिती समोर आली आहे. त्यांनी राधिकाला टेनिस अकादमी बंद करण्यास सांगितले होते, तसेच इंस्टाग्रामवर रील आणि व्हिडिओ अल्बम बनवण्याबाबतही त्यांनी तिला फटकारले होते.

राधिका यादवने एका वर्षांपूर्वी झीशान अहमद नावाच्या तरुणासोबत एका व्हिडिओमध्ये काम केले होते. या दोघांचे एक गाणेही आले होते. या तरुणावरही दीपक नाराज होते अशी माहितीही समोर आली आहे. या मुळेच त्यांनी मुलीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत दीपक यादव म्हणाले की, ‘मी मुलीच्या पैशावर जगतो यामुळे लोक मला टोमणे मारायचे. ती चुकीची कामे करते असे लोक माझ्या मुलीवर घाणेरडे आरोप करायचे. मला हे सर्व सहन होत नव्हतं. मी राधिकाला टेनिस अकादमी बंद करण्यासही सांगितले. पण तिने माझे ऐकले नाही. मी लोकांच्या टोमण्यांमुळे मी नाराज झालो होते, त्यामुळे मी तिची हत्या केली.’

राधिकाला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनायचे होते. राधिकाने गेल्या वर्षी झीशान अहमदच्या एका गाण्यात काम केले होते. या गाण्याचे नाव कारवां होते. मात्र वडील दीपक गाण्याचा व्हिडिओ डिलीट करण्यास सांगत होते. दीपक यांनी राधिकाने झीशानसोबत काम केललं आवडलेलं नव्हते, त्यामुळे ते नाराज होते.

कारवां या गाण्यात काम केले

राधिकाच्या गाण्याचे बोल, ‘कारवां चलता रहा मेरा. दिन भी ये धलता रहा मेरा.. फिर तुम्हारी याद आयी हमको. रो गये हम सोच करके तुमको’, असे होते. हे गाणे INAAM युट्यूब चॅनलवर रिलीज झाले होते. सध्या या गाण्याच्या कमेंट बॉक्समध्ये लोक प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटले की, ‘किती निष्पाप चेहरा आहे. डोळे ​​किती सुंदर आहेत. असे वाटत नाही की ही मुलगी आता या जगात नाही. दुसऱ्या एका नेटकऱ्यांने लिहिले की, ‘RIP राधिका’. आणखी एकाने लिहीले की, ‘वडिलांनी येथे काय पाहिले की त्याने तिला मारले? येथे कोणतीही नग्नता नाही, कोणतीही अश्लीलता नाही. प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. काहीतरी वेगळंच कारण आहे.

राधिकाचे काका काय म्हणाले ?

राधिकाच्या काकांनी सांगितले की, ‘सकाळी 10.30 वाजता आम्हाला मोठा स्फोट ऐकू आला होता, त्यानंतर मी आणि माझा मुलगा भावाच्या घरी गेलो. त्यावेळी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. माझ्या भावाकडे .32 बोरचा परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. राधिकाच्या कमरेवर गोळ्या लागलेल्या होत्या, त्यानंतर आम्ही तिला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.’