भारत कोण कोणत्या देशाला कर्ज देतो? हा आहे सर्वात जास्त कर्ज घेणारा देश, आकडा ऐकून धक्का बसेल

भारत हा आता फक्त कर्ज घेणारा देश राहिला नाही तर भारत देखील आता अनेक देशांना कर्ज देत आहे, नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतानं अनेक देशांना मोठी आर्थिक मदत केली आहे.

भारत कोण कोणत्या देशाला कर्ज देतो? हा आहे सर्वात जास्त कर्ज घेणारा देश, आकडा ऐकून धक्का बसेल
nirmala sitharaman
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 26, 2025 | 8:48 PM

भारत आता फक्त कर्ज घेणारा देश राहिला नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये भारत हा अनेक देशांना कर्ज देणारा आणि आर्थिक मदत करणारा एक महत्त्वाचा देश बनला आहे. आपल्या शेजारच्या देशांपासून ते अफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतल्या देशांपर्यंत भारत हा आज अनेक देशांना कर्जाचा पुरवठा करत आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या आर्थिक बजेटच्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात भारत कोण-कोणत्या देशाला आर्थिक मदत करतो आणि भारतानं आतापर्यंत कोणत्या देशाला सर्वाधिक कर्ज दिलं आहे, त्याबद्दल. आर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या 2024-25 अर्थसंकल्पानंतर जारी करण्यात आलेल्या एका डॉक्यूमेंटनुसार यावर्षी परराष्ट्र मंत्रालयासाठी 22,155 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. हे बजेट गेल्या वेळच्या बजेटपेक्षा तब्बल 18,050 कोटी रुपयांनी अधिक आहे.

भूतानला सर्वाधिक मदत

समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारताकडून सर्वाधिक आर्थिक मदत भूतानला मिळते, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भूतानला जवळपास 2,068.56 कोटी रुपये कर्ज भारताकडून मिळण्याचा अंदाज आहे, मात्र ही रक्कम गेल्यावेळच्या कर्जापेक्षा थोडी कमी आहे. आर्थिक वर्ष 2023 -24 मध्ये भारतानं भूतानला 2,398.97 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती, भूताननंतर नेपाळ, मालदीव आणि मॉरीशस या देशांचा नंबर लागतो, ज्यांना भारतानं सर्वाधिक कर्ज दिलं आहे.

भारत कोणत्या देशाला किती कर्ज देतो?

या यादीमध्ये सर्वात वर भूतानचा नंबर लागतो, भारत भूतानला 2,068.56 कोटी रुपयांचं कर्ज देतो, या यादीमध्ये दुसरा क्रमांक नेपाळचा लागतो, नेपाळला 700 कोटी रुपयांच कर्ज दिलं जातं. मालदीव 400 कोटी रुपये, मॉरीशस 370 कोटी रुपये, मॅनमार 250 कोटी रुपये, श्रीलंका 245 कोटी रुपये, अफगानिस्तान 200 कोटी रुपये, आफ्रिकन देश 200 कोटी रुपये, लॅटिन अमेरिका 30 कोटी रुपये या देशांना भारत कर्ज देतो. भारत जसा कर्ज देतो, तसाच तो इतर देशांकडून देखील कर्ज घोतो. भारतावर असलेल्या कर्जाचा आकडा 2020 पर्यंत 558.5 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे,  आकडा वाढतच आहे.