‘लॉकडाऊन’ शब्दाला राज्यांतील मुख्यमंत्री का घाबरत आहेत?; ‘जनता कर्फ्यू’, ‘ब्रेक द चेन’ असं का म्हणत आहेत?

| Updated on: Apr 14, 2021 | 5:28 PM

कोरोनाची लाट महाभयंकर असतानाही आणि कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट, तिप्पट वाढत असतानाही देशभरातील राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही. (why all states chief ministers not use lockdown word?)

लॉकडाऊन शब्दाला राज्यांतील मुख्यमंत्री का घाबरत आहेत?; जनता कर्फ्यू, ब्रेक द चेन असं का म्हणत आहेत?
uddhav thackeray
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनाची लाट महाभयंकर असतानाही आणि कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट, तिप्पट वाढत असतानाही देशभरातील राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही. अनेक राज्यातील मुख्यमंत्री लॉकडाऊन हा शब्द वापरताना कचरत आहेत. त्याऐवजी करोना कर्फ्यू, जनता कर्फ्यू, संचार बंदी, ब्रेक द चेन आदी शब्दांचा वापर करत आहेत. मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन हा शब्दा का वापरला जात नाही? यावर टाकलेला हा प्रकाश. (why all states chief ministers not use lockdown word?)

महाराष्ट्रात ब्रेक द चेन

महाराष्ट्रात आतापर्यंत 3519208 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2666097 लोकांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात दिवसाला 60 हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत. मुंबईत मंगळवारी सुमारे दहा हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लादले आहेत. राज्यात 1 मे पर्यंत म्हणजे 15 दिवसांसाठी संचार बंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात सर्व काही बंद ठेवण्यात येणार आहे. एक प्रकारचा हा लॉकडाऊनच आहे. परंतु त्याला लॉकडाऊन हे नाव दिलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन ऐवजी संचारबंदी हा शब्द वापरला आहे.

दिल्लीत नाईट कर्फ्यू

दिल्लीतही गेल्या 24 तासांत 13868 रुग्ण सापडले आहेत. दिल्लीतील कोरोना रुग्णांचा आकडा 75 हजाराच्यावर गेल्याने दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने नाईट कर्फ्यू लागू केला आहे. रात्री 10 वाजेपासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू असणार आहे. त्याशिया सरकारने अनेक निर्बंधही घातले आहेत. सभा, संमेलने आणि सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शाळा, महाविद्याले बंद करण्यात आले आहेत. लग्नापासून ते अत्यंविधी पर्यंतच्या उपस्थितींना लगाम लावला आहे. तसेच हॉटेलपासून मेट्रो आणि बस प्रवासातील संख्येलाही चाप लावण्यात आला आहे. केजरीवाल यांनीही नाईट कर्फ्यूच्या नावाखाली सर्व प्रकारची निर्बंध घातली आहेत. लॉकडाऊन सारखेच हे निर्बंध आहेत. मात्र, केजरीवाल यांनीही त्याला लॉकडाऊन हे नाव दिलेलं नाही.

मध्यप्रदेशात कोरोना कर्फ्यू

मध्यप्रदेशात 35 हजारांच्यावर रुग्ण संख्या गेली आहे. गेल्या 24 तासात मध्यप्रदेशातील चार बड्या शहरांमध्ये चार हजाराच्यावर रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे भोपाळमध्ये तर सात दिवसांचा कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. तसेच संपूर्ण राज्यातही अनेक निर्बंध घालण्यात आला आहे. राज्यात कोरोना कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत इयत्ता पहिली ते 8 वीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच गरज पडल्यास राज्यात 144 कलम लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. मात्र, त्यांनीही थेट लॉकडाऊन हा शब्द वापरला नाही. त्यांनी त्याला कोरोना कर्फ्यू असं म्हटलं आहे.

राजस्थानात जनता कर्फ्यू

राजस्थानातही कोरोनाच्या केसेस वाढल्याने जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांनी राज्यातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. तसेच लॉकडाऊन सारखे निर्बंध असणारी नियमावली तयार करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. जनता कर्फ्यूच्या नावाखाली हे निर्देश लागू केले जाणार आहेत.

उत्तर प्रदेशातही कर्फ्यू

उत्तर प्रदेशातही कोरोनाचा कहर वाढला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही कोरोना झाला आहे. राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कलम 144 लागू केलं आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी लॉकडाऊन लावण्याची आश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. लोकांचा जीव आणि रोजगार दोन्ही वाचवायचा आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊन शब्दाची भीती का?

कोरोनाचा कहर वाढत असतानाही राज्य सरकार आणि मोदी सरकार संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची हिंमत दाखवत नाहीत. कारण गेल्यावेळी मोदींनी देशभरात लॉकडाऊन लागू केला होता. तेव्हा त्यावर विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपासून ते अखिलेश यादव पर्यंत सर्वांनीच लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यामुळेच सर्व राज्यातील सरकारकडून लॉकडाऊन हा शब्द वापरणं टाळलं जात आहे. त्याऐवजी लॉकडाऊन सारखेच निर्बंध लागू करत असून त्याला दुसरं नाव देत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (why all states chief ministers not use lockdown word?)

 

संबंधित बातम्या:

रोहित पवारांनी विरोधकांना दाखवला आरसा, भाजपशासित राज्यातील परिस्थिती सांगत राजकारण टाळण्याचं आवाहन

शरद पवार रुग्णालयात, सुप्रिया सुळेंचं ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन भाषण, पंढरपूर पोटनिवडणुकीची सभा गाजवली

West Bengal Election 2021: राहुल गांधींची अखेर बंगालमध्ये एन्ट्री; पहिल्याच सभेत मोदी, ममतादीदींवर टीकास्त्र

(why all states chief ministers not use lockdown word?)