बापरे एवढं भयानक नाव? अ‍ॅपचं नाव ऐकताच भीतीने उडते गाळणं, तरीही लोकांनी एवढं डाऊनलोड केलं की सगळेच विक्रम मोडले

सध्या जगभरात अशा एका अ‍ॅपने धुमाकूळ घातला आहे, ज्या अ‍ॅपचं नाव ऐकताच तुमच्याही तोडांतून बापरे हाच पहिला शब्द बाहेर पडणार, तुम्ही देखील या अ‍ॅपचं नाव ऐकून भीऊ शकता, मात्र या अ‍ॅपने डाऊनलोडचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

बापरे एवढं भयानक नाव?  अ‍ॅपचं नाव ऐकताच भीतीने उडते गाळणं, तरीही लोकांनी एवढं डाऊनलोड केलं की सगळेच विक्रम मोडले
mobile
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 15, 2026 | 5:48 PM

आर यू डेडAre You Dead App हे नाव एखाद्या मोबाईल अ‍ॅपच असू शकतं? यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. हे एखाद्या हॉरर चित्रपटाचं नाव वाटतं. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हे एक मोबाईल अ‍ॅपलिकेशन असून, चीनमध्ये हे अ‍ॅप सध्या डाउनलोड चार्टमध्ये अल्पवधीतच प्रचंड वर पोहोचलं आहे. आर यू डेड हे अ‍ॅप आतापर्यंत चीनमध्ये सर्वात जास्त डाऊनलोड करण्यात आलेलं अ‍ॅप बनलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे जे लोक एकटे आहेत, किंवा ज्या लोकांना एकटं राहण्याची आवड आहे, असेच लोक हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करत आहेत. असे लोक या अ‍ॅपसोबत भावनिकरित्या जोडले गेले आहेत.

चीनमध्ये एकट्या राहणाऱ्या लोकांची संख्या झपाट्यानं वाढत आहे, याचं मोठं कारण म्हणजे कामासाठी कुटुंबाला सोडून दुसऱ्या शहरात, देशात स्थलांतर, उशिरा लग्न आणि बदलती जीवशैली हे प्रमुख घटक जबाबदार आहेत. एका आकडेवारीनुसार ही परिस्थिती एवढी भीषण आहे की, 2030 पर्यंत चीनमध्ये सिंगल लोकांची संख्या  200 मिलियन पर्यंत पोहोचू शकते.

हे मोबाईल अ‍ॅपलीकेशन एका साध्या सिद्धातांवर काम करते. ज्यांनी हे मोबाईल अ‍ॅपलिकेशन डाऊनलोड केलं आहे, त्यातील युजर्सला दर दोन दिवसांनी संबंधित अ‍ॅप उघडून एका मोठ्या बटनावर क्लिक करायचं आहे. यावरून या अ‍ॅपला असा संदेश मिळतो की तुम्ही सुस्थितीमध्ये आहात, तुमच्यासोबत काहीही दुर्घटना घडलेली नाहीये, मात्र जर तुम्ही दोन दिवसानंतर या अ‍ॅपवर क्लिक केलं नाही तर हे अ‍ॅप अ‍ॅटोमेटिक तुमच्याशी संबंधित जे लोक आहेत, तुमचे शेजारी किंवा इतर एमरजेन्सी यंत्रणा त्यांना धोक्याचा इशारा देते, आणि हे लोक तुमच्या घरी येतात. अगदी वृद्ध माणसांना देखील हे अ‍ॅप वापरता यावं म्हणून त्याची रचना खूप साधी करण्यात आली आहे, हे एक पेड अ‍ॅप आहे. मात्र तरी देखील अनेक जण हे अ‍ॅप डाऊनलोड कताना दिसत आहेत.