डी मार्टमध्ये बिलावर पेनाने तीन तिरक्या रेषा का मारल्या जातात? वर लिहिलेला आकडाही महत्त्वाचा, अनेकांना हे माहीतच नसतं

डी मार्ट हे अनेकांच्या हक्काचं शॉपिंगचं ठिकाण आहे. डी मार्टमध्ये विविध वस्तू तुम्हाला एकाच छाताखाली मिळतात, तसेच त्यावर भन्नाट ऑफर असल्यामुळे खरेदीसाठी ग्राहक डी मार्टमध्ये नेहमीच गर्दी करतात.

डी मार्टमध्ये बिलावर पेनाने तीन तिरक्या रेषा का मारल्या जातात? वर लिहिलेला आकडाही महत्त्वाचा, अनेकांना हे माहीतच नसतं
D-Mart
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 01, 2026 | 5:47 PM

आज असं एकही शहर नाही, जिथे डी मार्ट नाही. अगदी छोट्या -छोट्या शहरांपासून ते मुंबईसारख्या मेट्रोल शहरांपर्यंत डी मार्टचं जाळं पसरलं आहे. तुम्हाला प्रत्येक शहरात डी मार्ट दिसून येईल. ग्राहक देखील डी मार्टमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी करतात. ग्राहकांना डी मार्ट म्हणजे आपल्या हक्काचं खरेदीचं ठिकाण वाटतं, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर ग्राहकांना हव्या असलेल्या सर्व वस्तू त्यांना एकाच छता खाली मिळतात. त्यामुळे त्यांना हव्या असलेल्या वस्तुंसाठी फार धावपळ करण्याची गरज उरत नाही, अगदी रोजच्या दैनंदिन लागणाऱ्या किराणा सामानापासून ते फळ भाजीपाल्यापर्यंत आणि कपड्यापासून ते स्वयंपाक घरातील भाड्यांपर्यंत सर्व वस्तू डी मार्डमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. त्यामुळे लोक वस्तूंच्या खरेदीसाठी डी मार्टमध्ये गर्दी करतात.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डी मार्डमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध वस्तुंवर आकर्षित ऑफर ठेवलेली असते, इतर ठिकाणांपेक्षा ग्राहकांना डी मार्डमध्ये स्वस्त वस्तू मिळतात.  डी मार्टमध्ये विक्री ठेवलेल्या वस्तूंपैकी अनेक वस्तू तर अशा असतात, की तुम्ही जर एक वस्तू खरेदी केली तर दुसरी वस्तू तुम्हाला फ्री मिळते. त्यामुळे ग्राहक डी मार्टकडे आकर्षित होतात, आणि समान खरेदीसाठी तुफान गर्दी होते. तसेच डी मार्टमध्ये सेफ्ल सर्व्हिस असते, म्हणजे तुम्हाला वस्तूंच्या निवडीचं स्वतंत्र असतं, तुम्हाला हवी ती वस्तू आणि हव्या त्या कंपनीची वस्तू तुम्ही तुमच्या हाताने घेऊ शकतात.

मात्र अशा काही गोष्टी असतात, ज्या ग्राहक खरेदीसाठी गेल्यानंतर प्रत्येकवेळी पहातात परंतु त्यांना त्या गोष्टीचा अर्थ माहिती नसतो. आपण जेव्हा सर्व वस्तू खरेदी करून कॅश काऊंटरवर येतो, आपल्या सर्व सामानाचं बिल झाल्यानंतर कॅश काउंटवरील व्यक्ती आपल्या बिलावर तीन तिरक्या रेशा का मारतो? तसेच बिलाच्यावर एक आकडा देखील लिहिला जातो. हे का केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का? तर या तीन तिरक्या रेषांचा अर्थ असा होतो की, तुमचं बिल व्यवस्थित काळजीपूर्वक चेक केलं गेलं आहे, तुम्हाला सर्व वस्तू व्यवस्थित पोहोचल्या आहेत. तर बिलाच्या वर जो आकडा असतो, तो आकडा तुमच्याकडे सामानाच्या किती पिशव्या आहेत, त्याचा असतो.

Follow Us