Arvind Kejriwal: ‘हा देश तुमच्या बापाचा नाही…’, भाजपच्या बड्या मंत्र्यावर का भडकले अरविंद केजरीवाल?

Arvind Kejriwal on BJP: दिल्लीत सध्या थप्पड कांड, चापट प्रकरण गाजत आहे. एका मंत्र्याने भ्रष्टाचाराविरोधात जाब विचारणाऱ्या तरुणाच्या श्रीमुखात दिली. त्यावरून वातावरण तापले आहे. या मंत्र्याला आता माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुनावले आहे.

Arvind Kejriwal: हा देश तुमच्या बापाचा नाही..., भाजपच्या बड्या मंत्र्यावर का भडकले अरविंद केजरीवाल?
अरविंद केजरीवाल
| Updated on: Sep 29, 2026 | 9:59 AM

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीतील थप्पड कांडानंतर आक्रमक झाले. दिल्लीतील विकासपूरी आणि तिलकनगर परिसरातील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा रस्ता हातानेच उखडत असल्याचा जाब काही तरुणांनी भाजपचे मंत्री प्रवेश वर्मा यांना विचारला. यावेळी व्हिडिओ शुटिंग सुरू होते. या तरुणाला उत्तर देण्याऐवजी मंत्री वर्मा यांनी त्याच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर दिल्लीतील राजकारण तापले आहे. ‘हा देश तुमच्या बापाचा नाही’ असा संताप त्यावर केजरीवाल यांनी व्यक्त केला. सामान्य नागरिकांनी भ्रष्टाचाविरोधात आरोप केल्यावर भाजपचे मंत्री कशी प्रतिक्रिया देतात. कसे दडपण आणतात असे सांगत त्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.

अरविंद केजरीवाल भडकले

Loading...

रस्त्याच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणाला मंत्री प्रवेश वर्मा यांनी सर्वांसमक्ष चापट मारली. त्यावरून अरविंद केजरीवाल भडकले. “हा देश तुमच्या बापाचा नाही की तुम्ही कुणालाही श्रीमुखात लावाल, असे त्यांनी सुनावले. आम्ही सुद्धा 10 वर्षे दिल्लीत कारभार बघितला आहे. यापूर्वी दिल्लीत रस्त्यांची अशी निकृष्ट काम कधीच झाले नाही. या रस्ते योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मंत्र्यांना हा भ्रष्टाचार दाखवला तर त्यांनी साहिब सिंह या तरुणाला चापट मारली. प्रवेश वर्मा हे पंतप्रधान मोदींचे खास असतील. पण हा देश 140 कोटी लोकांचा आहे. जेव्हा ही जनता रस्त्यावर उतरेल. तुम्हाला पिटाळून लावेल, ती वेळ जवळ आली आहे.” असे केजरीवाल म्हणाले.

मंत्री प्रवेश वर्मांची हकालपट्टी करा

यावेळी केजरीवाल यांनी मोदींवरही निशाणा साधला. पंतप्रधान भजन क्लबमध्ये जातात. मोदी हे रात्री 12 वाजता व्हिडिओ तयार कता. जेन झी यांना कानखाली लगावतात आणि पुन्हा म्हणतात की जेन झी सोबत चांगले संबंध ठेवायचे आहे. यामुळेच जेन झी तुम्हाला शिव्या घालतात. तुम्ही अगोदर मंत्री प्रवेश वर्मा यांची हकालपट्टी करा अशी मागणी केजरीवाल यांनी केली.

मंत्र्यांविरोधात कारवाई, आमदारावर गुन्हा

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांच्याविरोधात कारवाई केली आहे. तिलकनगर येथे रस्ता पाहणीदरम्यान त्यांनी एका 22 वर्षीय तरुणाला थप्पड लगावली होती. तर यावेळी आम आदमी पक्षाचे आमदार जनरैल सिंह यांच्याविरोधात लोकप्रतिनिधींच्या कामात अडथळाप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us