महिला आपले वय आणि पुरुष सॅलरी का लपवतात? शेकडो वर्षांपूर्वीच्या काळात दडलंय गुपीत, तुम्हालाही माहीत नसेल खरं कारण

मराठी मध्ये अशी एक म्हण आहे की, पुरुषांनी त्यांचा पगार आणि महिलांनी त्यांचं वय कधीच कोणाला सांगायचं नसतं. मात्र असं का? याबाबत कधी तुम्ही विचार केला आहे का? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

महिला आपले वय आणि पुरुष सॅलरी का लपवतात? शेकडो वर्षांपूर्वीच्या काळात दडलंय गुपीत, तुम्हालाही माहीत नसेल खरं कारण
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2025 | 1:26 PM

मराठी मध्ये अशी एक म्हण आहे की, पुरुषांनी त्यांचा पगार आणि महिलांनी त्यांचं वय कधीच कोणाला सांगायचं नसतं. मात्र असं का? याबाबत कधी तुम्ही विचार केला आहे का? ही आधुनिक काळातील संकल्पना आहे की पूर्वीपासून चालत आलेली आहे? असाही प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. ही एक पूर्वीपासून चालत आलेली रणनिती आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत की पुरुष त्यांची सॅलरी आणि महिला त्यांचं खरं वय कधीच कोणाला का सांगत नाहीत?

पुरुष त्यांचं इन्कम आणि महिला त्यांचं वय का लपवतात? याबद्दल जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा या संकल्पनेचं मुळ आपल्याला शेकडो वर्षांपूर्वी जे विचार मांडण्यात आले, त्यामध्ये दिसून येतं. पुरुषांनी आपल्या सॅलरीची माहिती देण्यामध्ये आणि महिलांनी आपल्या वयाबाबत एखाद्या व्यक्तीला माहिती देण्यामध्ये अनेक धोके आहेत, ते धोके कोणते? आणि पुरुषांनी आपली सॅलरी तसेच महिलांनी आपल्या वयाबद्दल का सांगू नये? याबाबत शेकडो वर्ष आधीच आर्य चाणक्य यांनी सांगून ठेवलं आहे.

पुरुष सॅलरी का लपवतो? 

चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार सरळ साधा नियम आहे, जेव्हा तुमच्या प्रगतीबाबत इतरांसोबत तुम्ही चर्चा करता किंवा तुमच्याकडे किती पैसे आहेत? तुम्हाला किती पगार मिळतो? हे तुम्ही एखाद्याला सांगितलं की तो तुमचा हीत शत्रू बनतो. तुमची प्रगती प्रत्येकालाच देखवली जाईल असं नसतं. मग तो तुम्हाला अडचणीत आणण्याचं काम करतो, तुमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये मत्सर निर्माण होते. यातून तुमचे शत्रू वाढत जाण्याचा धोका असतो, म्हणून चाणक्य म्हणतात की पुरुषांनी कोणालाही कधीही आपल्याकडे किती धन आहे? हे सांगता कामा नये.

महिला आपलं वय का लपवतात? 

चाणक्य यांच्या मते महिला आपलं वय लपवतात या मागे केवळ समाजाचा दबाव किंवा त्यांच्या दिसण्याचं कारण नाही, तर महिलांना समाजामध्ये आपल्या उपयोगाचं मुल्य तसेच त्यांच्या कामाची क्षमता सिद्ध करायची असते. कुटुंबाची फार मोठी जबाबदारी महिलांवर असते, त्यामुळे महिला न थकता कामाचा भार एकहाती वाहून नेत असतात. आपलं आता वय वाढलं आहे, अशी जाणीव त्यांना त्यामुळे कधीच होत नाही. त्यामुळे महिला आपलं वय कधीही कोणालाही सांगत नाहीत. चाणक्य यांचे हे विचार आजच्या काळातही लागू होतात, आजही अनेक महिला आपलं वय तर पुरुष आपली सॅलरी इतरांपासून लपून ठेवतात.