सोन्याचे दागिने बनवल्यानंतर सोनार कपडे का जाळतो? तुम्हालाही माहीत नसेल खरं कारण

सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, सोन्याची खरेदी करणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. परंतु तुम्हाला हे माहीत हे का की दागिने बनवण्यासाठी ज्या कापडांचा वापर होतो ते नंतर का जाळले जातात?

सोन्याचे दागिने बनवल्यानंतर सोनार कपडे का जाळतो? तुम्हालाही माहीत नसेल खरं कारण
सोनार दागिने बनवल्यानंतर कपडे का जाळतो?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 9:43 PM

सध्या सर्वत्र सोन्याच्या भावाचीच चर्चा आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने वाढ होत आहे. 24 कॅरट सोन्याचे प्रती तोळा दर दीड लाखांवर पोहोचले आहेत. सोनं खरेदी करणं हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. सोनं महागल्याने लग्नाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही दिवसांपूर्वीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना वर्षभर सोन्याची खरेदी कमी करा असं आवाहन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर काही प्रमाणात सोन्याचे दर थोडे कमी झाले, मात्र पुन्हा एकदा सोन्याच्या दराने चांगलीच उसळी घेतल्याचं पहायला मिळत आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? एक सोन्याचा दागिना घडवायचा म्हणजे त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी तासन तास वेळ खर्च करावा लागतो. सोन्याचे दागिने घडवणारे जे कामगार आहेत, ते सोन्याचे दागिने घडवण्यासाठी जे कपडे वापरतात, ते कपडे नंतर जाळले जातात? हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की ते कपडे का जाळत असतील?

सोन्याचे दागिने घडवणारे कामगार केवळ फक्त दागिने तयार करण्यासाठी वापरलेले कापडच नाही तर ठारावीक कालावधीनंतर दागिने बनवण्याचं मशीन पुसण्याचे फडके आणि तसेच ज्या रूममध्ये सोन्याचे दागिने बनवण्याचं काम चालतं तिथे जमिनीवर आंथरलेलं कार्पेट देखील जाळून टाकतात, मात्र हे असं का केलं जातं? या मागं नेमकं काय कारण असावं याची उत्सुकता आता तुमच्या मनात निर्माण झालीच असेल.

असं का केलं जातं?

याबाबत बोलताना सोन्याचे दागिने निर्माण करणाऱ्या एका कारागिरीने सांगितलं की, जेव्हा ते एखादा दागिना घडवला जातो तेव्हा त्याला वेगवेगळे आकार द्यावे लागतात. दागिन्याला आकार देण्यासाठी त्याचं सुरुवातीला एका मोठ्या लांब काडीमध्ये रूपांतर केलं जातं. त्यानंतर या सोन्याच्या काडीला ठोकून आणि व्यवस्थित कट करून विविध आकार दिले जातात. मात्र हे सर्व करत असताना सोन्याचे काही कण त्या परिसरात उडतात. जेव्हा हे कापड जाळलं जातं तेव्हा ते सोन्याचे कण त्यापासून वेगळे होतात आणि ते सोनं पुन्हा एकदा वापरात आणलं जातं. त्यामुळे नुकसान टळतं, म्हणून सोन्याचा दागिना घडवण्यासाठी जेवढे काही कापडं वापरले जातात ती नंतर जाळली जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us