
Agni-Prime Missile : भारताने आपल्या नव्या पिढीच्या अग्नि प्राइम मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. रेल्वेतून मोबाइल लॉन्चरवरुन हे मिसाइल डागण्यात आलं. या मिसाइलची रेंज 2000 किलोमीटर आहे. DRDO आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेज कमांडने मिळून हे मिसाइल लॉन्च केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे ऐतिहासिक यश असल्याच सांगितलं. भारताचा निवडक देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे. ठराविक देशांकडेच रेल्वेमधून मिसाइल डागण्याची क्षमता आहे. अग्नि प्राइम मिसाइलची ही चाचणी इतकी खास का होती? ते समजून घ्या.
3 वैशिष्ट्यांमुळे हे मिसाइल फक्त शक्तीशाली ठरत नाही, तर भारताची संरक्षण रणनिती सुद्धा यामुळे मजबूत होणार आहे
कॅनिस्टरायजेशनचा फायदा काय?
कॅनिस्टरायजेशन म्हणजे हे मिसाइल एका सीलबंद कंटेनरमध्ये ठेवलं जातं. इथून हे मिसाइल स्टोर आणि लॉन्च दोन्ही करता येतं. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, यामुळे मिसाइलला तयार करण्यासाठी लागणारा भरपूर वेळ वाचतो. एकाबाजूला मिसाइलला लॉन्चिंगला तयार करण्यासाठी वेळ लागतो.अग्नि प्राइम मिसाइल लॉन्चसाठी काही मिनिटात तयार होऊ शकतं. कॅनिस्टरायजेशनमुळे मिसाइलच पाऊस, धूळ आणि गरमी यापासून रक्षण होतं. दीर्घकाळ ते सुरक्षित राहतं. या सुविधेमुळे भारताची शत्रुला प्रत्युत्तर देण्याची ताकद वाढणार आहे.
दुसरी खासियत काय?
अग्नि प्राइमची आणखी एक खास बाब म्हणजे रेल्वे आधारित मोबाइल लॉन्चर. या मिसाइलला खास पद्धतीने डिझाइन केलेल्या रेल्वे लॉन्चरवरुन डागता येऊ शकतं. म्हणजे हे मिसाइल एकाजागेवरुन दुसऱ्या ठिकाणी नेणं आणि लॉन्च करणं सोपं आहे. या मिसाइलचा शोध घेणं हे शत्रुसाठी खूप कठीण आहे. कारण रेल्वे नेटवर्कवर हे मिसाइल कुठेही असू शकतं. त्यामुळे शत्रूला अंदाज बांधण कठीण होईल. भारताला यामुळे स्ट्रॅटजिक रणनितीक आघाडी मिळेल. याची गतिशीलता (मोबिलिटी) मिसाइलला सुरक्षित आणि प्रभावी बनवते.
तिसरी ताकद
स्ट्रॅटेजिक एम्बिग्यूटी म्हणजे रणनीतिक अस्पष्टता ही अग्नि प्राइमची सर्वात मोठी ताकद आहे. कॅनिस्टरायजेशन आणि रेल्वे-आधारित मोबिलिटीमुळे या मिसाइलच अचूक लोकेशन शत्रुला समजणारच नाही. यामुळे भारताची सेकेंड-स्ट्राइक क्षमता म्हणजे पुन्हा प्रत्युत्तर देण्याची ताकद अधिक मजबूत होते. म्हणजे शत्रुने उद्या भारतावर हल्ला केला, तर अग्नि प्राइममुळे हे सुनिश्चित होईल की, भारत तात्काळ आणि प्रभावी प्रत्युत्तर देईल. याचा वेग आणि फास्ट लॉन्चिंग यामुळे याचा सामना करण शत्रुसाठी खूप कठीण होईल.