RSS रजिस्टर्ड का नाही? मोहन भागवत यांचं एक वाक्यात उत्तर, केलं मोठं वक्तव्य

अनेकदा असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो की, भारतातील सर्वात मोठी संघटना असलेली आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का करण्यात आलेली नाहीये? अखेर यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीच उत्तर दिलं आहे.

RSS रजिस्टर्ड का नाही? मोहन भागवत यांचं एक वाक्यात उत्तर, केलं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2025 | 4:04 PM

अनेकदा असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो की, भारतातील सर्वात मोठी संघटना असलेली आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का करण्यात आलेली नाहीये? अखेर यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीच उत्तर दिलं आहे. ते संघाच्या शताब्दीनिमित्त बंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, तुम्हाला माहीत आहे, सांघाची स्थापना 1925 मध्ये झाली, मग तुम्ही आमच्याकडून ही अपेक्षा करता का की आम्ही ब्रिटीश सरकारकडे नोंदणी करावी? आम्ही ज्या ब्रिटीश सरकारविरोधात लढत होतो, त्यांच्याकडेच आम्ही नोंदणी करावी का? असा सवाल यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताच्या कायद्यांमध्ये नोंदणी अनिवार्य नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

ज्या संघटनेची नोंदणी नाही अशा नोंदणीकृत नसलेल्या संस्थांनाही कायदेशीर दर्जा दिला जातो, आणि म्हणून आम्हाला या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे, तसेच संघटना म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आमच्यावर तीन वेळा बंदी घालण्यात आली होती, याचाच अर्थ आम्हाला सरकारने संघटना म्हणून मान्यता दिली आहे, असंही यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.जर आमची संघटना नसतीच तर त्यांनी कोणावर प्रतिबंध घातला असता? प्रत्येक वेळी न्यायालयानं आमच्यावरील बंदी मागे घेऊन आम्हाला एक कायदेशीर संघटना म्हणून मान्यता दिली आहे, असंही यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, संसद आणि इतर काही ठिकाणी अनेकदा आरएसएसबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला,मात्र न्यायालयानं सांगितलं की आरएसएस ही एक संघटना आहे, त्यामुळे ती असंवैधानिक नाहीये.अनेक गोष्टींची नोंदणी नसते, हिंदू धर्माची पण नोंदणी नाहीये, आरएसएसवर यापूर्वी तीनदा बंदी घालण्यात आली आहे, याचाच अर्थ सरकारने आम्हाला मान्यता दिली आहे. जर आमची संघटनाच नसती तर त्यांनी कोणावर प्रतिबंध घातला असता, असा सवाल यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे.