
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. यात एक शुभम द्विवेदी होते. दहशतवाद्यांनी शुभम यांची पत्नीसमोर गोळ्या घालून हत्या केली. सर्वसामान्य जनतेसह नेते मंडळी पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. शुभम यांच्या पत्नी म्हणाल्या की, ‘माझा नवरा मुस्लिम असता, तर तो आज जिवंत असता’ एका चॅनलला दिलेल्या त्यांच्या इंटरव्यूची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपवरुन लोक नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवालला ऐशान्याकडून शिकण्याचा सल्ला देत आहेत.
“जेव्हा लोक म्हणतात हिंदू-मुस्लिम एक आहेत, हे कानाखाली मारण्यासारखं आहे. दहशतवाद्यांनी हा विचार केला नाही. त्यांनी हिंदुंची हत्या केली. मुस्लिमांना वेगळं केलं. मुस्लिम सुरक्षितरित्या आपल्या घरी पोहोचले. आम्ही मुस्लिम असतो, तर आम्ही सुद्धा वाचलो असतो. आम्ही आता आमच्या घरी असतो. आमच्यासाठी भारतीय असणं जास्त महत्त्वाच होतं. आम्ही कधी धर्मावरुन भेदभाव केला नाही” असं ऐशन्या म्हणाली.
लोक हिमांशीला असा सल्ला का देतायत?
ऐशन्याच्या वक्तव्यानंतर लोकं नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवालला ऐशन्याकडून शिकण्याचा सल्ला देत आहेत. हिमांशीच्या एका वक्तव्यामुळे लोक तिला असा सल्ला देत आहेत. हिमांशीने मुस्लिम आणि काश्मिरीच्या मागे लागू नका असं आवाहन केलं होतं.
शुभमचा चेहरा रक्ताने माखलेला
ऐशन्या म्हणाला की, “मी कधी हिंदू-मुस्लिम फरक केला नाही. शुभमचे अनेक मुस्लिम मित्र आहेत. माझ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक मुस्लिम होते, पण आता आश्चर्य वाटतं” “जेव्हा दहशतवाद्यांनी विचारलं की, तुम्ही हिंदू आहात कि मुस्लिम? त्यावेळी मी हसली. मी विचारलं की काय चाललय. जेव्हा त्यांनी प्रश्न पुन्हा विचारला, त्यावेळी मी हिंदू असल्याच सांगितलं. त्यांनी लगेच गोळी चालवली. त्यावेळी माझ्यासाठी सगळं काही संपलं. शुभमचा चेहरा रक्ताने माखलेला” असं ऐशन्याने त्या भयानक अनुभवाबद्दल सांगितलं.
NIA च्या तपासात काय कळलय?
NIA ची टीम पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास करत आहे. हल्ल्याचा संपूर्ण कट पाकिस्तानात रचण्यात आल्याच प्रारंभिक तपासातून समोर आलय. दहशतवाद्यांना काही स्थानिक लोकांनी मदत केल्याच सुद्धा तपासात दिसलय.