AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यावर पट्टी, हात-पाय बांधलेले, रोमान्सच्या प्रतीक्षेत असलेल्या किरणला प्रेरणाने का संपवलं, त्याचं खरं कारण आलं समोर

किरण तिच्या घरी आला, त्यावेळी तिने आज सरप्राइज देणार असं सांगून बॉयफ्रेंडला कपडे काढायला लावले. त्याचे डोळे रुमालाने बांधले. हात-पाय बांधले. किरण रोमान्सच्या प्रतिक्षेत होता. पण प्रेरणाच्या मनात दुसरचं काही शिजलेलं. सगळीकडे या प्रकरणाची चर्चा आहे.

डोळ्यावर पट्टी, हात-पाय बांधलेले, रोमान्सच्या प्रतीक्षेत असलेल्या किरणला प्रेरणाने का संपवलं, त्याचं खरं कारण आलं समोर
Prerna-Kiran
| Updated on: Apr 23, 2026 | 9:32 AM
Share

प्रियकराला रोमान्सच्या जाळ्यात अडकवून त्याला क्रूर पद्धतीने संपवण्याचं प्रकरण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलं आहे. बंगळुरुमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रेरणाला अटक केली आहे. प्रेरणा आणि किरण दोघे 27 वर्षांचे आहेत. ते टेलिकॉमच्या दुकानात नोकरीला होते. तिथेच त्यांच्यात प्रेम बहरलं. रिलेशनशिप सुरु झाली. पण पुढे जाऊन या प्रेमाचा असा शेवट होईल, अशी कोणी कल्पनाच केली नसेल. खूप थंड डोक्याने पूर्ण प्लानिंग करुन प्रेरणाने प्रियकराला संपवलं. घरात कोणी नव्हतं, तेव्हा तिने किरणला बोलावलं. एकांत मिळेल म्हणून किरण सुद्धा तिथे गेला. वेस्टर्न स्टाइलने प्रपोज करण्याचा तिने बहाणा बनवला.

किरणने तिला टोकलं सुद्धा, हे तू काय करते आहेस. पण आज वेगळ्या पद्धतीन प्रपोज करतेय असं प्रेरणाने उत्तर दिलं. नवीन काही तरी म्हणून त्याने सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला. प्रेरणाने किरणचे डोळे बांधले. त्याला खुर्चीवर बसवून त्याचे हात-पाय बांधले. नंतर त्याला पेटवून दिलं. धक्कादायक म्हणजे तिने या सगळयाच मोबाइल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग केलं. ते 12 मिनिटांचं मोबाइलमधलं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे. हा महत्वाचा डिजिलट पुरावा आहे. प्रेरणाने दक्षिण बंगळुरुमधील अंजानापुरा येथील तिच्या घरी किरणला बोलावलं होतं.

इतका टोकाचा निर्णय प्रेरणाने का घेतला?

ज्या मुलावर इतकं प्रेम केलं, त्याला संपवण्याचा इतका टोकाचा निर्णय प्रेरणाने का घेतला? त्यामागची खरी कारणं काय आहेत, ते आता समोर आलं आहे. प्रेरणा आणि किरण मागच्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्यात मागच्या काही काळापासून भांडणं सुरु झालेली असं पोलिसांनी सांगितलं. किरण प्रेरणासोबत असताना सतत त्याच्या पूर्व प्रेयसीबद्दल बोलायचा. हे प्रेरणाला आवडत नव्हतं. प्रेरणामध्ये आणि त्याच्यात यावरुन बऱ्याचदा वादही झालेला. पूर्व प्रेयसीविषयी बोलण्यावरुन ती त्याला सतत टोकायची. ती लग्नासाठी सुद्धा किरणच्या मागे लागलेली.

त्यामुळे प्रेरणाचा राग वाढत चाललेला

पण किरण लग्नाला तयार होत नव्हता. तो दोघांची जात वेगवेगळी असल्याचं कारण देत होता. त्यामुळे प्रेरणाचा राग वाढत चाललेला. प्रेरणाचं वागणं त्याला विचित्र वाटायचं. म्हणून आपण तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहणार नाही हे त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं होतं. किरणला आपल्यासोबत रहायचं नाही हे प्रेरणाला कळलेलं.

ज्वलनशील द्रव एकत्र करुन बाथरुममध्ये ठेवलेले

त्यामुळे तिने किरणला संपवण्याचा निर्णय घेतलेला. तिने त्यासाठी चार लीटर रॉकेल विकत घेतलेलं. एक बॉटलमधून पेट्रोल आणलेलं. तिने हे दोन्ही ज्वलनशील द्रव एकत्र करुन बाथरुममध्ये ठेवलेले. किरण तिच्या घरी आला, त्यावेळी तिने आज सरप्राइज देणार असं सांगून बॉयफ्रेंडला कपडे काढायला लावले. त्याचे डोळे रुमालाने बांधले. हात-पाय बांधले. नंतर त्याच्या अंगावर मिक्स केलेलं पेट्रोल-केरोसिन टाकलं आणि पेटवून दिलं.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स