सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्या अटकेची मागणी का होतेय?

| Updated on: Jan 27, 2021 | 12:02 PM

दिल्लीत काल मंगळवारी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. (why users demand to arrest yogendra yadav on social media)

सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्या अटकेची मागणी का होतेय?
योगेंद्र यादव
Follow us on

नवी दिल्ली: दिल्लीत काल मंगळवारी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सोशल मीडियावरून तर दिल्ली हिंसेप्रकरणी स्वराज अभियानचे नेते आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेत्यांच्या अटकेची मागणी होत आहे. शेतकरी नेत्यांमुळेच ही हिंसा भडकल्याचा आरोप नेटकऱ्यांमधून होत आहे. (why users demand to arrest yogendra yadav on social media)

सोशल मीडियावरून अनेकांनी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेत टिकैत, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव आणि शेतकरी नेते दर्शनपाल सिंह यांना अटक करण्याची मागणी होत आहे. सिद्धार्थ नावाच्या एका यूजर्सने शेतकरी संघाच्या तथाकथित नेत्यांना अटक केली पाहिजे. दिल्लीतील हिंसेत झालेल्या मालमत्तेचं नुकसान या नेत्यांची संपत्ती विकून भरून काढलं पाहिजे, अशी मागणी सिद्धार्थ यांनी केली आहे. बॉलिवूड अभिनेते सुहेल सेठ यांनीही ट्विट केलं आहे. अराजकता निर्माण करणाऱ्या शेतकरी नेत्यांना अटक करा. योगेंद्र यादव कुठे आहेत? असा सवाल सुहेल सेठ यांनी केला आहे.

 

यादव कोण? अटकेची मागणी का?

योगेंद्र यादव हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते स्वराज अभियानचे प्रमुख आहेत. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सध्या या आंदोलनात ते प्रमुख भूमिका पार पाडत आहेत. शेतकरी आंदोलनात त्यांची महत्त्वाीच भूमिका राहिली आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे. शेतकरी आंदोलनाला कोणतंही गालबोट लागू नये, हे आंदोलन भरकटू नये म्हणून यादव यांनी सातत्याने काळजी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरच या आंदोलनाचा कसा फोकस राहील आणि त्याला राजकीय वळण मिळणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतली आहे. मात्र, तरीही योगेंद्र यादव यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. यादव यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन दोन महिने तग धरून ठेवलं म्हणून त्यांच्यावरील राग काढण्यासाठी त्यांच्या अटकेची मागणी होत असल्याची चर्चा आहे. यादव हे या आंदोलनामागचे ब्रेन असल्याने त्यांच्या अटकेनंतर आंदोलन भरकटेल म्हणूनही त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. त्याशिवाय कालच्या हिंसेचा चोहोबाजूने तपास व्हावा यासाठी यादव यांच्या अटकेचीही मागणी केली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शेतकरी आंदोलनातील काही नेत्यांनी यादव यांना या आंदोलनापासून दूर ठेवले होते. त्यामुळे आता या हिंसाप्रकरणात यादव यांना गोवून आंदोलन बळकावण्याचा या नेत्यांचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळेही यादव यांच्या अटकेची मागणी होत असावी, असंही सूत्रांनी सांगितलं. (why users demand to arrest yogendra yadav on social media)

 

यादव काय म्हणाले?

ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसेवर योगेंद्र यादव यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसेची मला लाज वाटतेय. त्याची मी जबाबदारी घेतो. सुरुवातीपासूनच मी शेतकरी आंदोलनाशी जोडला गेलो आहे. त्यामुळे काल जे काही घडलं त्याची मला लाज वाटतेय, असं यादव म्हणाले होते. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा आंदोलनावर वाईट प्रभाव पडतो. ही हिंसा कुणी केली आणि कुणी नाही केली हे मी आता सांगू शकत नाही. शेतकरी आंदोलनापासून आम्हाला दूर ठेवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांनीच ही हिंसा भडकावली आहे, असा आरोप यादव यांनी केला. पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच आपण जाऊ, या मार्गापासून विचलीत व्हायचं नाही, असं मी सुरुवातीपासूनच सांगतो होतो. आंदोलन शांततेत पार पडलं तरच आपण यशस्वी होऊ हे मी वारंवार शेतकऱ्यांना समजावून सांगत होतो, असंही ते म्हणाले. (why users demand to arrest yogendra yadav on social media)

संबंधित बातम्या:

दिल्ली हिंसाचाराला जबाबदार कोण? राकेश टिकैत? दीप सिद्धू? लक्खा सिधाना?

दिल्ली हिंसाचारात ज्याचं नाव समोर येतंय तो लक्खा सिधाना कोण आहे?

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?, आशिष शेलारांचा हल्लाबोल

LIVE | महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन, कुठे फेडाल हे पाप?, शेतकरी आंदोलन हिसांचारावरुन भाजपचा हल्लाबोल

(why users demand to arrest yogendra yadav on social media)