ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X का लिहितात, छोट्या बोर्डवर लिहिलेल्या LV चा अर्थ काय?

| Updated on: May 18, 2021 | 9:46 PM

वास्तविक, हा मोठा X केवळ प्रवासी गाड्यांवरच लिहिलेला असतो. हा X नेहमीच रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर लिहिलेला असतो, म्हणजेच तो त्या रेल्वेचा शेवटचा डबा आहे. (Why write X on the last bogie of the train, what is the meaning of LV written on a small board)

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X का लिहितात, छोट्या बोर्डवर लिहिलेल्या LV चा अर्थ काय?
ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X का लिहितात
Follow us on

नवी दिल्ली : भारतात मोठ्या प्रमाणात लोकं ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनचा प्रवास हा इतर वाहनाच्या तुलनेत अतिशय आरामदायी असतो. असे क्वचितच लोकं असतील ज्यांनी ट्रेनने प्रवास केला नसेल. मात्र ट्रेन तर नक्की पाहिली असेलच. तुम्हाला भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेशी संबंधित काही खास चिन्हां(Signs)बाबत माहित आहे का? प्रवासी गाड्यांवर अनेक प्रकारची चिन्हे(Signs) केली जातात म्हणजेच प्रवासी गाड्या आणि या सर्व चिन्हां(Signs)ना स्वतःचे महत्त्व आहे. जर ही विशेष चिन्हे(Signs) गाड्यांमध्ये तयार केली गेली नाहीत तर भारतीय रेल्वेचे कामकाज जवळजवळ अशक्य होईल. (Why write X on the last bogie of the train, what is the meaning of LV written on a small board)

ट्रेनच्या डब्यात मोठा X का लिहिला जातो?

तुम्ही कधी ट्रेनने प्रवास केला नसला तरी तुम्ही बऱ्याच गाड्या पाहिल्या असतील. तुम्ही पाहिलं असेल ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर एक खूप मोठा X लिहिलेला असतो. परंतु आपण कधी विचार केला आहे की ट्रेनच्या शेवटचा डब्यावर इतका मोठा X का लिहिलेला असतो, याचा अर्थ काय आहे? आम्ही आपल्याला या एक्सबद्दलची संपूर्ण माहिती येथे देणार आहोत. वास्तविक, हा मोठा X केवळ प्रवासी गाड्यांवरच लिहिलेला असतो. हा X नेहमीच रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर लिहिलेला असतो, म्हणजेच तो त्या रेल्वेचा शेवटचा डबा आहे.

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर लिहिलेल्या LV चा अर्थ काय?

पॅसेंजर ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X सोबतच एका छोट्या बोर्डवर LV देखील लिहिलेले असते. या LV चा अर्थ लास्ट व्हेईकल(Last Vehicle) असा आहे. ही दोन्ही चिन्हे(Signs) प्रामुख्याने रेल्वे अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी केली आहेत. या चिन्हांचा सर्वसामान्यांशी काही संबंध नाही. जर कोणत्याही रेल्वे अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एक्स(X) किंवा एलव्ही(LV) लिहिलेले दिसले नाही तर तो तातडीने जवळच्या कंट्रोल रूमला कळवतो. जर ही दोन्ही चिन्हे ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर दिसत नसतील तर याचा अर्थ असा होतो की ट्रेनचा शेवटचा डबा किंवा मागील भागातील काही भाग रेल्वेपासून विभक्त झाला आहे. (Why write X on the last bogie of the train, what is the meaning of LV written on a small board)

इतर बातम्या

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला मोठा झटका, ब्रिटिश न्यायालयाने बँकरप्सी याचिका फेटाळली

मनपाच्या बिटको रुग्णालयात शॉर्टसर्किट, व्हेंटिलेटर जळाल्याची माहिती