कर्जबुडव्या विजय मल्ल्याला मोठा झटका, ब्रिटिश न्यायालयाने बँकरप्सी याचिका फेटाळली

ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा पैसा वसूल होण्याची आशा निर्माण झाली आहे.

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला मोठा झटका, ब्रिटिश न्यायालयाने बँकरप्सी याचिका फेटाळली
Vijay Mallya
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 9:38 PM

मुंबई : कर्जबुडवा उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याला ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय. लंडन उच्च न्यायालयाने मंगळवारी बँकरप्सी याचिका फेटाळून लावलीय. ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा पैसा वसूल होण्याची आशा निर्माण झाली आहे. कारण, कोर्टाने मल्ल्याच्या प्रॉपर्टीवर असलेलं सुरक्षा कव्हर हटवलं आहे. विजय मल्ल्या भारतीय बँकांना 900 कोटी रुपयांचा चूना लावून ब्रिटिशमध्ये लपून बसला आहे. विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाईन्स बंद पडली आहे. आता भारतीय बँका मल्ल्याची भारतातील संपत्ती जप्त करुन आपलं कर्ज वसूल करु शकतील. (London High Court slams Vijay Mallya, rejected the bankruptcy petition)

भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात मागणी केली होती की, विजय मल्ल्या याच्या भारतातील संपत्तीवर असलेलं सुरक्षा कव्हर हटवण्यात यावं. उच्च न्यायालयाने बँकांची ही मागणी मान्य केली आहे. लंडन उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतीय बँका मल्ल्याची संपत्ती जप्त करुन त्याचा लिलाव करु शकतील आणि आपली रक्कम वसूल करु शकतील. लंडन उच्च न्यायालयाचे चीफ इन्सॉल्वेंसी अँड कंपनीज कोर्टाचे न्यायमूर्ती मायकल ब्रिग्स यांनी भारतीय बँकांच्या बाजूने निर्णय दिलाय. विजय मल्ल्या याच्या संपत्तीला सुरक्षा कव्हर प्रदान करण्यासाठी कोणतीही पब्लिक पॉलिसी उपल्बध नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय.

मल्ल्याकडे वकिलाला द्यायलाही पैसे नाहीत?

विजय मल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे मल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे. भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून मल्ल्या लंडनला फरार झाला आहे. कधीकाळी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या मल्ल्याला आता मात्र आर्थिक घरघर लागली आहे. त्याला लंडनमध्ये हजार आणि लाख रुपयांचाही हिशोब ठेवावा लागत आहे. त्याच्या वैयक्तिक खर्चांनाही चाप लागला असून वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

14 कोटी द्या

आर्थिक चणचणीमुळे कोंडीत सापडलेल्या मल्ल्याने लंडनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फ्रान्समधील मालमत्ता विकल्यानंतर आलेल्या रकमेपैकी 14 कोटी रुपये आपल्याला देण्यात यावेत, अशी विनंती त्याने या याचिकेतून कोर्टाला केली आहे. लंडनमध्ये मल्ल्याच्या बाजूने खटला लढवणाऱ्या वकिलाला त्याची फी मिळाली नाही. त्यामुळे या वकिलाने पुढच्या सुनावणीपर्यंत रकम न मिळाल्यास खटला लढणे बंद करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या :

विजय मल्ल्या भारताच्या ताब्यात मिळणार का? आज सुनावणी

विजय मल्ल्याला भारताकडे सोपवा, लंडनमधील कोर्टाचे आदेश

London High Court slams Vijay Mallya, rejected the bankruptcy petition

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.