विजय मल्ल्याला भारताकडे सोपवा, लंडनमधील कोर्टाचे आदेश

लंडन : कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारताकडे सोपवा, असे  आदेश लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टाने आदेश दिले आहेत. भारतातील बँकांना चुना लावून विजय मल्ल्या देशाबाहेर पळाला असून, सध्या तो लंडनमध्ये आहेत. तिथे वेस्टमिंस्टर कोर्टात त्याच्यावर खटला सुरु होता. अखेर मल्ल्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे. सीबीआयने लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “लवकरात लवकर विजय …

विजय मल्ल्याला भारताकडे सोपवा, लंडनमधील कोर्टाचे आदेश

लंडन : कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारताकडे सोपवा, असे  आदेश लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टाने आदेश दिले आहेत. भारतातील बँकांना चुना लावून विजय मल्ल्या देशाबाहेर पळाला असून, सध्या तो लंडनमध्ये आहेत. तिथे वेस्टमिंस्टर कोर्टात त्याच्यावर खटला सुरु होता. अखेर मल्ल्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे.

सीबीआयने लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

“लवकरात लवकर विजय मल्ल्याला आम्ही भारतात आणू, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही या खटल्यासाठी मेहनत घेतली आहे. आमच्याकडे पुरावे आणि सत्य गोष्टी होत्या, त्यामुळे आम्हाला खात्री होती की, मल्ल्याला भारताकडे सोपवलं जाईल.” – सीबीआय

विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सने 2004 ते 2012 या काळात 17 बँकांकडून एकूण 7800 कोटी रुपयांचे कर्ज घेतला. यासाठी मल्ल्याने पर्सनल गॅरंटी दिली होती. मात्र, या बँकांचे पैसे परत न करताच विजय मल्ल्या भारतातून पळून गेला.

विजय मल्ल्यावर कुठल्या बँकेचे किती कर्ज?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)- 1,900 कोटी रुपये

पंजाब नॅशनल बँक – 800 कोटी रुपये

IDBI – 800 कोटी रुपये

बँक ऑफ इंडिया – 650 कोटी रुपये

बँक ऑफ बडोदा – 550 कोटी रुपये

यूनाइटेड बँक ऑफ इंडिया – 430 कोटी रुपये

सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 410 कोटी रुपये

यूको बँक – 320 कोटी रुपये

कॉर्पोरेशन बँक – 310 कोटी रुपये

इंडियन ओव्हरसीज बँक – 140 कोटी रुपये

फेडरल बँक – 90 कोटी रुपये

पंजाब अँड सिंध बँक – 60 कोटी रुपये

अॅक्सिस बँक – 50 कोटी रुपये

इतर बँका – 603 कोटी रुपये

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *