भारत पाकिस्तानला ‘टेरर स्टेट’ म्हणून जाहीर करणार का? या पावलाने पाकच्या नांग्या ठेचल्या जाणार का?

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात आघाडी उघडली आहे. दिल्लीत सातत्याने बैठकांचा जोर चालू आहे. पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविण्याची तयारी भारताने केली आहे.

भारत पाकिस्तानला टेरर स्टेट म्हणून जाहीर करणार का? या पावलाने पाकच्या नांग्या ठेचल्या जाणार का?
| Updated on: Apr 30, 2025 | 6:57 PM

पाकिस्तानने पोसलेला दहशतवाद भारतालाच नाही तर जगाला देखील तापदायक ठरला आहे. कारण भारतात पुलवामा, उरी, संसदेवरील हल्ला, मुंबईवरील हल्ला, कंधार हायजॅक अशा अनेक जखमांचे थेट कनेक्शन थेट पाकिस्तानशी जोडलेले आहे. अशात भारत पाकिस्तानला टेटर स्टेट म्हणून घोषीत करणार का ? असा सवाल केल जात आहे.

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात आघाडी उघडली आहे. दिल्लीत सातत्याने बैठकांचा जोर चालू आहे. पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविण्याची तयारी भारताने केली आहे. दोन्ही देशात केव्हाही युद्ध पेटेल अशी स्थिती आहे. भारताची तयार पाहून पाकच्या मंत्र्याने मध्यरात्री पत्रकार परिषदत घेऊन भारत आपल्यावर 24 ते 36 तासांत हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची भीती जाहीर केली आहे.

भारताची युद्धसज्जता पाहून पाकिस्तानला दरदरुन घाम फुटला आहे. राजीधानीत दिल्लीत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय कॅबिनेट कमिटीची (CCPA) बैठक झाली. त्याआधी सुरक्षा प्रकरणाचे कॅबिनेट कमिटीचीही बैठक झाली आहे. त्यामुळे भारत काही तरी मोठे करणार याचा अंदाज पाकिस्तानी सरकारला आला आहे.

भारतात अनेक हल्ल्यांना जबाबदार

अमेरिकेने अतिरेक्यांना संरक्षण देणाऱ्या, हत्यार पुरविणाऱ्या आणि अतिरेक्यांना फंड देणाऱ्या काही देशांना स्टेट स्पॉन्सर्स ऑफ टेररिज्म ( State sponsors of terrorism ) म्हणजे अतिरेक्यांना पोषणारा देश असे घोषीत केले आहे. या इराण, क्युबा,उत्तर कोरिया आणि सिरिया या देशांचे नाव सामील आहे. अमेरिकनेने जे देश वारंवार आंतरराष्ट्रीय अतिरेकी हल्ल्यांना पाठींबा देतात, त्यांना तीन कायद्यांनुसार नॉमिनेट करीत या यादीत टाकले आहे.

अमेरिकेच्या लिस्टमध्ये असे 4 देश

ही यादी वादग्रस्त आहे. यादीत अमेरिकेने अशा देशांचा समावेश केला आहे जे देश त्यांना छळत आहेत. या यादी इराण आणि सिरिया यांना वगळले तर उत्तर कोरिया आणि क्युबा सारख्या देशांचा अतिरेक्यांचे पोषण केल्याचा कोणताही इतिहास नाही. तरी अमेरिकेशी तणाव निर्माण झाल्याने या देशाला यादीत टाकल्याचा आरोप होत असतो.

परंतू आता भारत केवळ निषेधाचे खलिते पाठवणार नाही तर थेट हल्ल्याला हल्ल्यानेच उत्तर देणार आहे.
या यादीत एकदा नाव समाविष्ट केले की अमेरिका अशा दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांवर ४ प्रकारचे निर्बंध लादते. यात अमेरिकेच्या परकीय मदतीवर निर्बंध, संरक्षण निर्यात आणि विक्रीवर बंदी, दुहेरी वापराच्या वस्तूंच्या निर्यातीवर नियंत्रण आणि आर्थिक निर्बंध आदींचा समावेश आहे. अमेरिका अशा देशांना पुन्हा यादीतून काढूही शकते. अमेरिकेने या यादीत क्युबा (२०२१) या देशाचा अलिकडेच समावेश केला आहे.परंतू आता भारत असे पाकिस्तानसोबत करू शकेल का ?

आंतरराष्ट्रीय कायदा अडसर

आंतरराष्ट्रीय कायदे कोणत्याही देशाला टेरर स्टेट घोषीत करण्यासाठी परवानगी देत नाही. संयुक्त राष्ट्र संघटना ( युएन ) आणि अमेरिकेच्या कायद्यात अशा धोरणांचा समावेश केलेला आहे. युएनमध्ये कोणत्याही देशाला टेटर स्टेट घोषीत करण्याची औपचारिक प्रक्रिया नाही. कारण हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय आहे.तसेच स्थायी सदस्य चीन आणि रशिया यांच्या विटो मुळे असे करणे शक्य नाही.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ( UNSC ) अतिरेकी संघटनांवर आणि व्यक्तींवर प्रतिबंध लावण्यासाठी कलम १२६७ अन्वये प्रस्ताव पारित करु शकते. परंतु हे एखाद्या देशाला थेट टेरर स्टेट घोषित करण्यासाठी लागू होत नाही. या रेझॉल्युशनमध्ये जागतिक दहशतवादी आणि जागतिक दहशतवादी संघटनांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत समाविष्ट झाल्यानंतर, व्यक्ती किंवा ग्रुपवर प्रवास बंदी, मालमत्ता जप्त करणे आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे यासारखे निर्बंध लादले जातात.

PAK ची ‘इंटरनॅशनल बेइज्जती’ करण सोप्प नाही का?

‘पाकिस्तानला अतिरेकी राष्ट्र घोषीत करणे अवघड आहे, अशात पाकिस्तानी आर्मीला आतंकी घोषीत करावे का ?. पाकिस्तानात त्यांचे लष्कर सर्वोच्च ताकदवान आहे, अतिरेकी संघटनांना थेट पाकचे लष्करच पोसत असते. परंतू संपूर्ण देशाला अतिरेकी राष्ट्र घोषीत करणे तितकेसे सोपे नाही. आंतरराष्ट्रीय कायदा यास मान्यता देणार नाही. भारताला त्यांच्या पातळीवर असे करता येईल जसे अमेरिका करत आला आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारतासाठी डोकेदुखी होऊ शकते

जर अमेरिकेने पाकिस्तानला ‘टेटर स्टेट’ जाहीर केले तर त्याच्यावर आपसुकच आर्थिक निर्बंध, व्यापारी निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सहाय्यता आदीत कपात करणे या सारखी पावले उचलावी लागतील. जसे अमेरिका अन्य देशांसोबत करत आली आहे. यामुळे या क्षेत्रात तणाव निर्माण होईल आणि पाकिस्तानची परिस्थिती आणखी भयानक होईल. तसेच पाकिस्तान हा अण्वस्र संपन्न देश असल्याने येथे अस्थिरता तयार होणे हे भारतासाठी डोकेदुखी होऊ शकते. अतिरेक्यांच्या तावडीत जर ही अण्वस्रे सापडली तर संपूर्ण जगालाच धोका निर्माण होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.