AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धापूर्वीच पाकिस्तान उद्ध्वस्त, पाकमध्ये सर्वात मोठा आर्थिक भूकंप

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानशी युद्धाची तयारी कशी करत आहे. त्यामुळे पाकिस्तानत भीती पसरली आहे. या भीतीमुळे पाकिस्तानचा शेअर बाजार दोन तासांत ३ टक्क्यांहून अधिक घसरल्यामुळे पाकिस्तानला दोन तासांतच ४६ हजार कोटी पाकिस्तानी रुपयांचे नुकसान झाले.

युद्धापूर्वीच पाकिस्तान उद्ध्वस्त, पाकमध्ये सर्वात मोठा आर्थिक भूकंप
| Updated on: Apr 30, 2025 | 5:46 PM
Share

एकीकडे पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभागाचे पुरावे समोर आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात युद्धाचे ढग जमले आहेत. केंद्र सरकारने भारतीय सैन्याला सर्वाधिकार दिल्यानंतर आता पाकिस्तानात मातम पसरला आहे.पाकिस्तानच्या शेअर बाजारात याचे पडसाद उमटले आहेत. कामकाज सुरु होताच दोन तासातच पाकिस्तानचा शेअरबाजार संपूर्णपणे क्रॅश झाला आहे. कराची स्टॉक एक्सचेंज तीन टक्क्याहून अधिक पडझडीने कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर तर अक्षरश: आर्थिक भूकंपच आला…

त्यामुळे तीन लाखांहून अधिक शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे १२० मनिटांतच ४६ हजार कोटी पाकिस्तानी रुपयांत नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे भारताच्या शेअरबाजारावर देखील युद्धजन्य वातावरणाचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. आताही सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही हिरव्या निशानावर कामकाज करीत आहेत. चला तर पाहूयात अखेर पाकिस्तानच्या शेअर बाजारात कशा प्रकारचे आकडे पाहायला मिळत आहेत.

पाकिस्तानचा शेअर बाजार झाला क्रॅश

पहलगामच्या हल्ल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानच्या शेअरबाजारात तशी कोणतीही स्थिरता पाहायला मिळत नाही. गेले वर्षभर बाजार स्थिर होता. २२ एप्रिल नंतर पाकिस्तानचा शेअरबाजार ६ टक्क्यांहून अधिक कोसळला.त्यानंतर गेल्या एक वर्षात पाकिस्तानच्या शेअरबाजाराचा रिटर्नला पाहाता तो ६० टक्क्यांच्या जवळपास आहे. बुधवारी भारताच्या सोबतच्या युद्धजन्य वातावरणामुळे कराची स्टॉक एक्स्चेंज ३ टक्क्यांहून जास्त क्रॅश झाला आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुपारी १२ वाजताच्या सुमारास केएसई १०० हा ३,६७९.२५ अंकांनी घसरणीसह १११,१९२.९३ अंकासह दिवसभराच्या सर्वात तळाला पोहचला.

जेव्हा दु.१२.३५ वाजता केएसई २,६७५.१५ अंकांच्या घसरणींसह ११२,१९७.०३ अंकांवर कारभार करीत आहे. एक दिवसआधी संपूर्ण कामकाजाच्या सत्रात घसरण पाहायला मिळाली. परंतू शेवटच्या काही मिनिटांत शेअर बाजाराने स्वत:ला रिकव्हर केले आणि ८०० हून जादा अंकांच्या तेजीसह ११४,८७२.१८ अंकांवर बंद झाला. २२ एप्रिल नंतर केएसई -१०० हा ६.११ टक्के घसरणीसह ७,२३७.४२ अंकांची घसरण पाहायला मिळाली.

3 लाखांहून ज्यादा गुंतवणूकदारांचे ​नुकसान

पाकिस्तानच्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना दोन तासात कामकाजात दरम्यान मोठे नुकसान झाले. एक दिवसाआधी जेव्हा केएसई १०० बंद जेव्हा बंद झाला होता. तेव्हा त्याचा मार्केट कॅप ५१.२५ अब्ज डॉलरवर होता. बुधवारी शेअरबाजाराचे काम सुरु झाल्यानंतर दोन तासांच्या आत तीन आठवड्यांच्या लोअर लेव्हलला पोहचल्यानंतर केएसईचे मार्केट कॅप ४९.६१ अब्ज डॉलरवरला आला होता. याचा अर्थ दोन तासांतच पाकिस्तानचा शेअर बाजाराचा मुख्य इंडेक्सचा मार्केट कॅप १.६४ अब्ज डॉलर म्हणजेच पाकिस्तानी करन्सीमध्ये ४६ हजार कोटी रुपयांहून जास्त कमी झाला. या पाकिस्तानच्या तीन लाखांहून अधिकार शेअर बाजार गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या शेअर बाजारात युद्धाचे दहशत पाहायला मिळाली आहे.ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात बचैनी खूपच वाढली असून शेअरबाजारात सपाटून विक्री सुरु झाली आहे.

भारताच्या शेअर बाजारात किरकोळ तेजी

भारताच्या शेअर बाजारात किरकोळ तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअरबाजाराच्या मुख्य निर्देशांक सेन्सेक्स ९५.३३ अंकाच्या उसळीनंतर ८०,३८७.९२ अंकांवर कामकाज करीत आहे. तर सेन्सेक्स कामकाज सुरु झाल्यानंतर ८०,४७८.७३ अंकांच्या उच्चांकावर पोहचला. तर सेन्सेक्समध्ये सुरुवाती कामकाजादरम्यान घसरणही पाहायला मिळाली. आणि आकडा ८०,०५५.८७ अंकांसह दिवसभराच्या सर्वात खालच्या पातळीवर देखील पोहोचला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टी देखील १८.१५ अंकांच्या तेजीसह २४,३५४.१० अंकावर कारभार करीत आहे. कामकाजाच्या सत्रादरम्यान निफ्टी २४,३९५.२० अंकांवर आला होता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.