रजनीकांत यांची राजकारणातून माघार; कमल हसन पोकळी भरून काढणार?; वाचा सविस्तर रिपोर्ट

| Updated on: Dec 29, 2020 | 2:24 PM

दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर गारूड निर्माण करणारे सुपरस्टार, 'थलायवा' रजनीकांत यांनी नवा पक्ष स्थापन न करण्याची घोषणा करून राजकारणातून माघार घेतली आहे. (will kamal haasan get political benefits after Rajinikanth backfoot on politics?)

रजनीकांत यांची राजकारणातून माघार; कमल हसन पोकळी भरून काढणार?; वाचा सविस्तर रिपोर्ट
Follow us on

चेन्नई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर गारूड निर्माण करणारे सुपरस्टार, ‘थलायवा’ रजनीकांत यांनी नवा पक्ष स्थापन न करण्याची घोषणा करून राजकारणातून माघार घेतली आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे तामिळनाडूतील राजकीय समीकरणावरून नवनवे आडाखे बांधले जात असून रजनीकांत यांच्या या निर्णयाने मक्कल निधि मय्यम (एमएनएम) पक्षाचे नेते कमल हसन यांना फायदाच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रजनीकांत यांची माघार आणि करुणानिधी, जयललिता या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कमल हसन भरून काढतील, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (will kamal haasan get political benefits after Rajinikanth backfoot on politics?)

ही तर ‘श्रीं’ची इच्छा

रजनीकांत यांनी ट्विटरवरून तीन पानी ट्विट करून ही घोषणा केली आहे. तामिळमध्ये लिहिलेल्या पत्रात रजनीकांत यांनी आपल्या पक्ष प्रवेश न करण्याची कारणं दिली आहेत. माझी तब्येत खालावली आहे. हा ईश्वराचा सूचक इशाराच मानतो. त्यामुळे मी राजकीय पक्ष स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लोकांनी त्यांना मी बळीचा बकरा बनवलं असं समजू नये, असं रजनीकांत यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

‘या’ कारणासाठी राजकारणाय यायचं होतं

जयललिता यांच्यापाठोपाठ करुणानिधी यांचंही निधन झालं. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या राष्ट्रीय पातळीवर दबदबा असलेला आणि तामिळनाडूवर अधिराज्य गाजवणारा बडा नेता तामिळनाडूच्या राजकारणात नाही. त्यामुळे तामिळनाडूत राजकीय बदलाची गरज होती. ही गरज ओळखूनच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. स्वच्छ, प्रामाणिक आणि पारदर्शी राजकारण करण्याची गरज आहे. जाती-धर्मापासून मुक्त अशा राजकारणाची गरज आहे. सध्या देशात अध्यात्मिक राजकारणाची गरज आहे. हीच माझी इच्छा आहे आणि हेच माझं लक्ष्य आहे, असं सांगत रजनीकांत यांनी अध्यात्मिक राजकारणासाठी राजकारणात येण्याची घोषणा केली होती.

‘उलंगा नायगन’ पोकळी भरून काढणार?

रजनीकांत यांना तामिळनाडूत थलायवा म्हणतात. तर कमल हसन यांना ‘उलंगा नायगन’ म्हणतात. ‘उलंगा नायगन’चा अर्थ ‘विश्वचा हीरो’ असा होतो. कमल हसन यांच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव आहे. त्यांची राजकीय समज पक्की असून तामिळनाडूतील राजकारणाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. शिवाय तामिळनाडूत पडद्यावरील ताऱ्यांना नेहमीच राजकारणात मोठं स्थान मिळालेलं आहे. सध्या तामिळनाडूत इंडस्ट्रीतील एकही कलाकार नाही. त्यामुळे कमल हसन यांना या संधीचा फायदा मिळू शकतो. ते जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनाने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढू शकतात, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

रजनीकांतही स्पर्धेत नाही

स्टॅलिन आणि रजनीकांत यांचा अपवाद वगळता तामिळनाडूत कमल हसन यांना कोणताही स्पर्धक नव्हता. त्यात रजनीकांत यांनी माघार घेतल्याने त्यांना थेट आता स्टॅलिन यांच्याशी सामना करावा लागणार आहे. तामिळनाडूत भाजपचा प्रभाव नाही. काँग्रेसही नावाला शिल्लक आहे. शिवाय कमल हसन नेहमीच प्रादेशिक अस्मितेच्या बाजूने उभे राहिल्याने त्यांना राजकीय प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वाधिक फॅन्स क्लब

तामिळनाडूतील राजकारणात कोणत्या अभिनेत्याचे किती फॅन्स आहेत हे सुद्धा महत्त्वाचं मानलं जात आहे. हे फॅन्स एकप्रकारे मतदारच असतात आणि राज्यातील राजकारणावर प्रभाव पाडत असतात. तामिळनाडूत कमल हसन यांचे 5,00,000 फॅन्स क्लब आहेत. तर रजनीकांत यांचे केवळ 50,000 फॅन्स क्लब आहेत. त्यामुळे कमल हसन या फॅन्सच्या जोरावर तामिळनाडूचं राजकारण फिरवू शकतात, असंही बोललं जात आहे. कमल हसन यांच्या फॅन्स क्लबला ‘नरपानी इयेक्कम’ म्हटलं जातं. याचा अर्थ चांगल्या कामासाठी आंदोलन करणारे. हसन यांचे फॅन्स क्लब चांगल्या सामाजिक कामावर भर देत असतात, तर रजनीकांत यांचे फॅन्स क्लब रजनीकांत यांची पूजा करण्यावर भर देतात, हा या दोन्ही फॅन्स क्लबमधला मूलभूत फरक आहे. (will kamal haasan get political benefits after Rajinikanth backfoot on politics?)

 

संबंधित बातम्या:

अर्धा देश उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? कमल हसन यांचा मोदींना सवाल

LIVE | प्रकाश आंबेडकर यांना ऐक्य करायचं नसेल तर त्यांनी एनडीए ला पाठिंबा द्यावा : आठवले

Rajnikant | सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात नो एन्ट्री! काय आहे कारण?

(will kamal haasan get political benefits after Rajinikanth backfoot on politics?)