WITT समिट 2026: 23 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद

WITT Summit 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा TV9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026'चे प्रमुख पाहुणे असतील. या शिखर परिषदेत भारताची ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक भविष्य यावर मोठे मंथन होईल. उद्यापासून 23-24 मार्च या दरम्यान हे संमेलन होत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि कॉर्पोरेट जगातातील दिग्गज हजेरी लावतील.

WITT समिट 2026: 23 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद
WITT Summit 2026_ PM Modi to attend on March 23
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Mar 22, 2026 | 1:39 PM

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 23 मार्च रोजी TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’मध्ये सहभागी होतील. WITT समिट 2026 हे भारतीय विचारवंत, धोरणकर्ते आणि जगातील तत्रांना एकाच मंचावर एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येते. या मंचावर देशाचे भविष्य आणि जागतिक मंचावर भारताची वाढती भूमिका यावर सखोल चर्चा होईल. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला चारचांद लागतील. ते विकसीत भारत आणि जागतिक संबंध यावर प्रकाश टाकतील. WITT या मंचावर भारताच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रीय आणि अंतराराष्ट्रीय मुद्दांवर महत्त्वपूर्ण संवाद होईल.

या संमेलनात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विनी वैष्णव यांच्यासह मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सहभागी होतील. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी सारख्या विरोधी बाकावरील नेत्यांची उपस्थिती या मंचाची निष्पक्षता आणि विश्वसनीयतेवर शिक्कामोर्तब करते.

ऊर्जा आणि पायाभूत विकासावर मंथन

कॉर्पोरेट जगतातील जॅक्सन समूहाचे संचालक समीर गुप्ता आणि जॅक्सन ग्रीनचे उपाध्यक्ष आणि जागतिक सीईओ बिकेश ओगरा या संमेलनात सहभागी होतील. स्वच्छ ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात जॅक्सन समूह सक्रिय भूमिका निभावत आहे. या समूहाची उपस्थिती याकडे लक्ष वेधते की, देशाच्या ऊर्जा क्षेत्राच्या धोरणाला आकार देण्यासाठी खासगी क्षेत्राचा आवाजही महत्त्वाचा आहे.

संमेलनापूर्वी समीर गुप्ता, संचालक, जॅक्सन समूह यांनी सांगितले की, भारताचे ऊर्जा संक्रमण झपाट्याने वाढत आहे आणि व्याप्त होत आहे. त्याकडे जगाचे बारकाईने लक्ष आहे. या प्रक्रियेला शाश्वत बनवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक सातत्य प्रस्थापित करणे हे खरं आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

TV9 नेटवर्कच्या सर्व प्लॅटफॉर्मवरुन थेट प्रसारण

जॅक्सन ग्रीनचे उपाध्यक्ष आणि जागतिक सीईओ बिकेश ओगरा यांनी यावर जोर दिला की, जागतिक ऊर्जा संक्रमण केवळ एका देशाच्या प्रयत्नांनी साध्य होणार नाही. विकसनशील अर्थव्यवस्था ही विकासाशी तडजोड न करता स्वच्छ ऊर्जेसाठी नेतृत्व करू शकतात. ही दाखवण्याची संधी भारताला आहे.

व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट हे हळूहळू देशातील सर्वात प्रभावशाली वार्षिक संमेलनांपैकी एक ठरले आहे. यंदा जेव्हा भारताचे आर्थिक धोरण आणि भूराजकीय महत्त्व जागतिक मंचावर नवीन उंची गाठत आहे, तेव्हा या संमेलनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. TV9 नेटवर्कच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून या संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Follow Us