AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT Summit 2026 : युद्धाच्या काळात विचारलं जातं तुम्ही कुणाच्या बाजूने, माझं एकच उत्तर, आम्ही… नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान

PM Modi in WITT Summit 2026 : टीव्ही9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' (WITT) या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी भारत कुणासोबत आहे यावर भाष्य केले आहे.

WITT Summit 2026 : युद्धाच्या काळात विचारलं जातं तुम्ही कुणाच्या बाजूने, माझं एकच उत्तर, आम्ही... नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
PM Modi WITT Summit 2026
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 23, 2026 | 9:14 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) या समिटमध्ये भाग घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मागील दोन WITT कार्यक्रमांची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या भाषणाने झाली होती. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने या समिटचे उद्धाटन झाले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केले. जगातीस संकटाच्या काळात भारत कुणासोबत आहे? यावरही पंतप्रधान मोदींनी भाष्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

भारताने प्रत्येक संकटाचा सामना केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, तुम्ही मागच्या पाच सहा वर्षाकडे पाहा. कोरोनाच्या नंतर आव्हाने एकामागून एक वाढत आहेत. असं एखादं वर्ष नाही की ज्याने भारताची, भारतीयांची परीक्षा घेतलेली नाही. पण 140 कोटी देशवासियांच्या एकजूटीच्या प्रयत्नाने भारताने प्रत्येक संकटाचा सामना करून मार्गक्रमण केलं आहे. या काळात युद्धाच्या परिस्थितीत भारताची नीती आणि रणनीती पाहून, भारताचं सामर्थ पाहून जगातील अनेक देश अचंबित आहे.

आम्ही शांततेच्या बाजूने – पंतप्रधान

जागतिक परिस्थितीवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, ’28 तारखेपासून जगात उलथापालथ सुरू आहे. या कठीण प्रसंगातही भारत पुढे जात आहे. या 23 दिवसात भारताने रिलेशनशीप क्षमता दाखवली आहे. निर्णय घेण्याची क्षमता दाखवली आहे. संकट व्यवस्थापनाची क्षमताही दाखवली आहे. आज जग विखुरलं आहे. भारताने अभूतपूर्व आणि अकल्पनीय ब्रिजेस तयार केले आहे. गल्फपासून ग्लोबल देशापर्यंत ग्लोबल साऊथ पासून शेजारी देशापर्यंत भारत सर्वांचा विश्वासू पार्टनर आहे. काही लोक विचारतात तुम्ही कुणासोबत आहात. त्यांना एकच उत्तर आहे, आम्ही भारताच्या बाजूने आहोत. शांततेच्या बाजूने आहोत. भारताच्या हिताच्या बाजूने आहोत. संवादाच्या बाजूने आहोत.’

सरकार नागरिकांच्या बाजूने – पंतप्रधान

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘संकटाच्या या काळात जेव्हा जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे. भारताने डायव्हर्सिफिकेशन आणि रेजिलिएन्सचं मॉडेल सादर केलं आहे. ऊर्जा असेल, खते असेल किंवा अत्यावश्यक वस्तू असतील. आपल्या नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी भारताने निरंतर प्रयत्न केला. अजूनही करत आहे. राष्ट्रनितीही राजनीतीचा आधार असेल तर देशाचं भवितव्य सर्वोच्च असतं.’

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?