AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोमोज खाल्ल्याने महिलेचा मृत्यू , 50 जणांना झाली विषबाधा

दिवाळीचा सणाचा आनंद घेत असतानाच अनेक ठिकाणी मिठाई किंवा अन्नपदार्थ खाताना सावधानता बाळगावी अशी बातमी आली आहे. मोमोज खाल्ल्याने विषबाधा होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मोमोज खाल्ल्याने महिलेचा मृत्यू , 50 जणांना झाली विषबाधा
| Updated on: Oct 29, 2024 | 1:52 PM
Share

मोमोज खाणे अनेकांना आवडत असते. परंतू रस्त्याच्याकडेला उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे आरोग्याला धोकादायक असते. शोरमा, पाणीपुरी तसेच मोमोज सारख्या पदार्थांतून यापूर्वी देखील विषबाधा झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशा हैदराबाद येथील बंजारा हिल्स परिसरात रस्त्यावरील एका फेरीवाल्याकडून मोमोज खाल्ल्याने एका महिलेला विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात 50 जणांची प्रकृती ढासळली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून मोमोज विक्री करणाऱ्या दोघा जणांना अटक केली आहे.

हैदराबाद येथील रेशमा बेगम (31 ) त्यांच्या मुलांसह शुक्रवारी मोमोज खाण्यासाठी याच परिसरातील एका विक्रेत्याकडे गेले होते. त्यावेळी परिसरातील इतर लोकांना आणि त्यांना मोमोज खाल्लानंतर शनिवारी सकाळी उलट्या आणि जुलाब होऊ लागले. त्यांना बंजारा हिल्स परिसरातील विविध रुग्णालयात दाखल केले गेले. रेशमा बेगम यांच्या तब्येत जास्त खराब झाल्याने त्यांना निजाम इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे हलविण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात मोमोज तसेच मेयोनिज आणि चटणी यातून देखील अन्नपदार्थांत विष तयार झालेले असावे अशी शक्यता अधिकाऱ्यांना वाटत आहे. पेद्दापली येथील मुथारमच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या 36 विद्यार्थ्यांना देखील अन्नपदार्थांतून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वांना पेद्दापल्ली येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या विद्यार्थींनीची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी प्रमोद कुमार यांनी सांगितले.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था