रात्री पतीसोबत राहीन पण, दिवसा प्रियकरासोबत राहू द्या, महिलेच्या मागणीने पोलिसही चक्रावले..

गेल्या काही दिवसात प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याच्या घटना वाढल्या होत्या. कोणी पतीला बाथरुमच्या फरशी खाली पुरले तर कोणी निळ्या ड्रममध्ये आता एक अशी विचित्र बातमी पुढे आली आहे.

रात्री पतीसोबत राहीन पण, दिवसा प्रियकरासोबत राहू द्या, महिलेच्या मागणीने पोलिसही चक्रावले..
BRIDE AND GROOM CLOSE UP
| Updated on: Aug 23, 2026 | 11:13 PM

एका विवाहित महिलांना एका तरुणाशी प्रेम झाल्यानंतर तिने त्या तरुणाशी लग्न केले. त्यामुळे चिडलेला तिचा पती पोलिस ठाण्यात आला. आता पोलिसांवर या महिलेने असा काही दावा केला की पोलिसांच्या डोके बधीर होण्याची वेळ आली आहे. पती दिवसाचा कामाला जाईल तर प्रेमीसोबत राहू द्या, रात्री मी पतीसोबत असेन, महिलेने असा आपला दिनक्रम जाहीर करणारा ड्युटी चार्टच पोलिसांना सादर केला आहे.

Immoral relationship

पती आणि पत्नी यांचे नातं विश्वासावर टीकून असते. या विश्वासाला एकदा तडा गेला की पुन्हा तो मिळवणे कठीण असते. मात्र, जर एकाच छताखाली पती, पत्नी आणि प्रियकर राजीखूशी राहायला तयार असेल तर याला काय म्हणावे. अशी विचित्र केस पोलिसांकडे पोहचली तेव्हा पोलिस देखील चक्रावले. या महिलेने माझा पती दिवसाचा कामाला जात असतो, त्यामुळे आपण प्रियकरासोबत दिवसा राहू आणि रात्री आपण पुन्हा पतीसोबत राहू असा ड्युटी चार्टच पोलिसांना या महिलेने सादर केल्याने पोलिसांना डोके धरायची वेळ आली आहे.

सीतापूरच्या महमूदाबाद कोतवाली पोलिस ठाण्यात हे पती-पती विवादाचे प्रकरण पोहचले आहे. या प्रकरणात विशेष म्हणजे पती, पत्नी आणि महिलेचा प्रेमी तिघेही जण पोलिस ठाण्यात पोहचले. या वेळी आम्ही तिघेही एकत्र राहायला तयार आहोत. परंतू आपल्या दोन नणंदा आणि सासरे यासाठी तयार नसल्याचे या महिलेने म्हटले आहे. आता यावर पर्याय म्हणून या महिलेने दिवसा आपण बॉयफ्रेंड सोबत राहू आणि रात्री पतीसोबत राहू असा ड्युटी चार्टच सादर केल्याने पोलिसही चक्रावले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us