
पाटणा: बिहारच्या विधानसभा निवडणूकांत एनडीएला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. तर महागठबंधनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर बिहारात राहून अनेक वर्षे अभ्यास करुन बिहारचा कायापालट करण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज’ पक्षाचा मोठा पराभव होऊन एकही जागा मिळालेली नाही. या निवडणूकीत एनडीएच्या विजयात सगळ्या मोठा वाट महिला मतदारांचा राहिला आहे. महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांनी अधिक प्रमाणात गर्दी करुन मतदान केले आहे. या महिलांना एनडीएचा सायलेंट व्होटर म्हटले आहे. त्यामुळे महिलांची सुप्त शक्ती एनडीएला वरदान ठरली आहे. महिला मतांची टक्केवारी, पुरुषांच्या तुलनेत...