
Tragic Incidents In India : 2025 हे वर्ष संपायला काही दिवस शिल्लक आहेत… पण हे वर्ष खूप काही दाखवून गेलं… कधी काहीही आणि कुठेही होऊ शकतं हे या वर्षाने दाखवून दिलं आहे. हे वर्ष केवळ तारखा आणि घटनांची मालिका नव्हती, तर अशा घटनांनी भरलेलं होतं ज्यांनी अनेक कुटुंबांचं जीवन कायमचं बदललं आणि सोबत फक्त वाईट आठवणी राहिल्या… काही ठिकाणी श्रद्धेचं रूपांतर शोकात झालं, तर काही ठिकाणी उत्सवाचं रूपांतर किंचाळण्यात झालं. गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आणि जबाबदारी यात थोडीशीही चूक झाल्यास त्याचं परिणाम किती गंभीर असू शकतात हे या घटनांवरून स्पष्ट दिसून आलं… यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले…
वर्षाची सुरूवात प्रयागराजमधील महाकुंभपासून झाली… यादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि अनेक भक्तांना आपले प्राण गमवावे लागले. 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी संगम तीरावर भाविकांची मोठी गर्दी जमली होती. अचानक परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि गोंधळ उडाला. भक्त एकमेकांच्या अंगावर पडले आणि किंचाळण्याचा रडण्याचा आवज येऊ लागला… सुरुवातीला समोर आलेल्या माहिनीनुसार, यामध्ये 30 पेक्षा अधिक भक्तांनी आपले प्राण गमावले… त्यानंतर या संख्येत मोठी वाढ झाली.
महाकुंभनंतर 15 फेब्रुवारी 2025 मध्ये नवी दिल्ली स्थानकावर भयानक हल्ला झाला. प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांची वाट पाहत प्लॅटफॉर्म 14 आणि 15 वर मोठी गर्दी जमली होती. ट्रेनला उशीर झाल्याने आणि प्लॅटफॉर्म बदलल्याच्या अफवांमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे महिला आणि मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाला.
देश यामोठ्या दुःखातून सावरलं पण नव्हतं, काही आठवड्यात 22 एप्रिल 2025 मध्ये जम्मू – काश्मीर येथील पहलगाम याठिकीणी दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर निशाणा साधला आणि होत्याचं नव्हतं झालं… यामध्ये 26 पर्यटकांचं निधन झालं… ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली…
4 जून 2025 रोजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल विजयाचा आनंद त्यांच्या चाहत्यांसाठी एक संकट ठरला. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजय साजरा करण्यासाठी मोठी गर्दी जमली आणि गोंधळ उडाला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 11 जणांनी आपले प्राण गमावले…
त्यानंतर काही दिवसांत 9 जून 2025 मध्ये गर्दीत प्रवासी ट्रेनमधून पडून चार जणांचा मृत्यू आणि 13 जण जखमी झाले. मुंबई लोकल ट्रेन अपघाताने गर्दी आणि सुरक्षिततेबाबत गंभीर समस्या अधोरेखित केल्या. एवढंच नाही, यंदाच्या वर्षी मुंबई लोकल अपघातात अनेकांना प्राण गमावले.
12 जून रोजी एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर जवळच एका होस्टेलवर कोसळले होते. या अपघातात विश्वार कुमार हा प्रवाशीच आश्चर्यकारकरित्या वाचला होता. तो या अपघातातील एकमेव जिवंत व्यक्ती आहे. बोईंग 787 ड्रीमलायनर विमान दुर्घटनेत 241 प्रवासी आणि 19 इतर लोकांचा मृत्यू झाला होता.
सौदी अरेबियातील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन पिढ्या संपल्या. कुटुंबातील 18 जण जागीच गेले. धार्मिक कार्यासाठी गेलेल्या भाविकांनी भीषण आगीत स्वतःचे प्राण गमावले आहे. ही फक्त दुर्घटना नही तर, बसीमधील 45 भारतीय प्रवाशांची अखेरची यात्रा ठरली.