Youth Killed in Tractor Rally: ऑस्ट्रेलियात शिक्षण, तीन दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनात, हिंसाचारात जीव गमावणाऱ्या युवकाची कहाणी

| Updated on: Jan 27, 2021 | 12:56 PM

नवरीट नावाचा युवक ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो भारतात आला होता. Youth Killed in Tractor Rally

Youth Killed in Tractor Rally: ऑस्ट्रेलियात शिक्षण, तीन दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनात, हिंसाचारात जीव गमावणाऱ्या युवकाची कहाणी
पलटी झालेला ट्रॅक्टर
Follow us on

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. हिंसाचाराच्या घटनेत 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तर, ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे मृत्यू झालेल्या युवकाची (Youth Killed in Tractor Rally) ओळख पटली आहे. नवरीट नावाचा युवक ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो भारतात आला होता. तो तीन दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाशी जोडला गेला होता. (Youth Killed in Tractor Rally was from Rampur of up studying in Australia)

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार नवरीट काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातून भारतात परत आला होता. 27 वर्षीय नवरीट शेतकरी आंदोलनाशी जोडला गेला होता. मात्र, त्याच्या कुटुंबाला याबाबत कसलीच माहिती नव्हती. नवरीट हा उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यतील दिबदिबा गावातील असल्यची माहिती समोर येत आहे. रामपूर जिल्ह्यातील विलासपूर भागातील शेतकरी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. मंगळवारी दिल्लीच्या आयटीओजवळ ट्रॅक्टर पलटी झाल्यानं नवरीटचा मृत्यू झाला होता.

नवरीट ज्या ट्रॅक्टरवर बसला होता तो पलटी झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून धोकादायक पद्धतीनं ट्रॅक्टर चालवले जात होते.पोलिसांनी जखमी नवरीटला वाचवण्याचा प्रयत्न केला होता .मात्र ,आंदोलकांनी मदत करु दिली नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे. आंदोलक त्या युवकाच्या मृतदेहाजवळ बसले होते. ते पोलिसांना जवळपास जाऊ देत नव्हते. पोलिसांचा नवरीटच्या मृतदेहाचं पोस्ट मॉर्टम करण्याच प्रयत्न होता, असं पोलिसांकडू सांगण्यात आलं.

हिंसाचारात 300 पोलीस जखमी; दिल्ली पोलिसांची माहिती

नवी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारमध्ये 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांकडून पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता आहे. क्राईम ब्रँचकडे हिंसाचाराचा तपास सोपवला जाण्याची शक्यता आहे.

“लाल किल्ल्यावर ज्यांनी झेंडे फडकावले त्यांना शिक्षा मिळणार आहे. मागील दोन महिन्यांपासून एका समुदायाविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. हे शीख समुदायाचं आंदोलन नसून शेतकऱ्यांचं आंदोलन आहे”, असं राकेश टिकैत म्हणाले. तर, कोई पंधेर, पन्नू आणि दीप सिद्धू या तीन लोकांना पंजाबच्या शेतकऱ्यांनी निर्देशित केलं आहे. त्यांनी कालची घटना घडवली. त्यांना मोठ्या प्रमाणात फंडिंग झालं आहे. ते लोक शेतकरी आंदोलानाला उद्धवस्त करु पाहत आहेत. सरकारनं अशा लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे, असं काँगेस नेते रवनीत सिंह बिट्टू म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या:

Fact Check : लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून तिथं खलिस्तानवाद्यांचा झेंडा फडकावला का? वाचा सविस्तर

सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्या अटकेची मागणी का होतेय?

(Youth Killed in Tractor Rally was from Rampur of up studying in Australia)