ज्योती मल्होत्राचं पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत जेवण आणि…? व्हिडीओमधून समोर आलेलं सत्य धक्कादाक

Youtuber Joti Malhotra: 'त्या' एका गोष्टीमुळे समोर आला ज्योती मल्होत्राचा खरा चेहरा, पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत जेवण केल्यानंतर... व्हिडीओमधून समोर आलेलं सत्य धक्कादाक...

ज्योती मल्होत्राचं पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत जेवण आणि...? व्हिडीओमधून समोर आलेलं सत्य धक्कादाक
| Updated on: May 18, 2025 | 11:27 AM

Jyoti Malhotra: भारतातील नागरिकांना मोठा झटका लागला जेव्हा भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगीरी करणाऱ्यांची यादी समोर आली. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण सुरु असताना यादी समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सांगायचं झालं तर, यादीमधून अनेक नावं समोर आली आहे. पण त्यातील एक नाव हैराण करणारं आहे आणि ते नाव आहे ज्योती मल्होत्रा हिचं…. ज्योतीचं नाव समोर आल्यानंतर तिला हरियाणातील हिसार येथून अटक करण्यात आली आहे.

सांगायचं झालं तर, ज्योतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ज्योती उच्चायोगातील अधिकारी दानिशसोबत दिसली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर झालं. दानिशने ज्योतीला पाकिस्तानला पाठवलं होतं आण जिथे तिने भारताबाबत गुप्तचर माहिती शेअर केली… असा दावा देखील करण्यात येत आहे.

पाकिस्तान उच्चायुक्तालयात जेवण करताना ज्योती मल्होत्रा

व्हिडिओमध्ये ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या इमारतीचे कौतुक करताना आणि एका डिनर पार्टीला उपस्थित राहताना दिसली. यादरम्यान, दानिश स्वतःच्या पत्नीची ओळख ज्योतीसोबत करून देतो. दानिश आणि अली एहसान नावाच्या लोकांनी ज्योतीची ओळख पाकिस्तानात असलेल्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली होती. तिने किमान दोनदा पाकिस्तानला भेट दिल्याचे उघड झालं आहं, जिथे तिच्या संशयास्पद हालचाली समोर आल्या. अशी माहिती देखील तपासातून समोर आली आहे.

पाकिस्तानी गुप्तहेर कशी बनली?

मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये ज्योती हिला पाकिस्तानमध्ये बोलवण्यात आलं. तेथे दानिश याच्यासोबत ज्योतीचे संबंध घट्ट झाले. त्यानंतर अली अहवान नावाच्या व्यक्तीने पाकिस्तानमध्ये त्यांच्या राहण्याची आणि फिरण्याची पूर्ण व्यवस्था केली. तिथे ज्योतीची भेट पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंधित शकीर आणि राणा शाहबाज यांच्याशी झाली. कोणताही संशय येऊ नये म्हणून, शाकीरचा नंबर ‘जात रंधावा’ म्हणून सेव्ह करण्यात आला.

भारतात परतल्यानंतर देखील ज्योती सतत व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानला गुपित माहिती पोहचवत होती.
तपास यंत्रणांना असेही आढळून आलं आहे की, ज्योतीचं इंस्टाग्राम अकाउंट अनेक संशयास्पद क्रियाकलापांशी जोडलं गेलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक महिना आधी तिने श्रीनगर आणि पहलगामला भेट दिली होती आणि त्यानंतर मार्चमध्ये पाकिस्तानला गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पंजाब आणि हरियाणामधून 6 पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी बहुतेक दानिशशी संबंधित आहेत. भारत सरकारने या संपूर्ण प्रकरणात कठोर कारवाई केली आहे आणि दानिशला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.