मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, राजकारण तापलं

मोठी बातमी समोर आली आहे, काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, राजकारण तापलं
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 8:57 PM

मोठी बातमी समोर येत आहे, बागपत जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच काँग्रेसने तातडीनं जिल्हाध्यक्षपदावरून युनूस चौधरी यांची हाकालपट्टी केली आहे.प्रदेशाध्यक्षांकडून युनूस चौधरी यांच्या हाकलपट्टीसंदर्भातील एक पत्रक जारी करण्यात आलं आहे.युनूस चौधरी यांचा एका तरुणीसोबतचा अर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान हा व्हिडीओ खोटा असून ही मला फसवण्यासाठी विरोधकांची चाल आहे, हा व्हिडीओ इडीट करण्यात आल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.

शुक्रवारी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ काँग्रेसचे बागपत जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष युनूस चौधरी यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये युनूस चौधरी अर्धनग्न अवस्थेत असून त्यांच्यासोबत एक तरुणी देखील आहे. दोघांमध्ये अश्लील संभाषण सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चौधरी यांची पक्षानं तडकाफडकी जिल्हाध्यक्षपदावरून हाकालपट्टी केली आहे.या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना युनूस चौधरी यांनी म्हटलं की, हा व्हिडीओ खोटा असून ही मला फसवण्यासाठी विरोधकांची चाल आहे, हा व्हिडीओ इडीट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार चौधरी यांनी ज्याने व्हिडीओ व्हायरल केला त्याचा शोध घेण्याची पोलिसांना विनंती केली आहे. मात्र याविरोधात त्यांनी आतापर्यंत कुठलीही तक्रार दाखल केलेली नाहीये.अनेक काँग्रेस नेत्यांनी आपल्याला या व्हिडीओबद्दल काही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे तर काहींनी प्रतिक्रिया देताना या व्हिडीओबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली.या व्हिडीओबाबत अजून आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही, तक्रार प्राप्त झाल्यास तपास सुरू करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....