Shivsena vs Bjp : विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून एकाच प्रतिक्रियेनं गार करण्याचा प्रयत्न, भाजप नेते आक्रमक

विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकाच प्रतिक्रियेनं गार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झालेत. मात्र भाजपच्या आशिष शेलारांनी एका पाठोपाठ एक 4 ट्विट करुन, सत्ताधारी शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार केलाय.

Shivsena vs Bjp : विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून एकाच प्रतिक्रियेनं गार करण्याचा प्रयत्न, भाजप नेते आक्रमक
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 1:28 AM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात. मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्येच थेट लढाई आहे. त्यातच शेलार, भातखळकर, सोमय्या, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे मुंबईतले नेते शिवसेनेवर तुटून पडतायत. त्याचाच समाचार मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, अशी टीका करुन घेतला. मात्र पलटवाराची संधी भाजपला मिळालीय.

विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकाच प्रतिक्रियेनं गार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झालेत. मात्र भाजपच्या आशिष शेलारांनी एका पाठोपाठ एक 4 ट्विट करुन, सत्ताधारी शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार केलाय.

पहिला ट्विट हल्ला

गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का? गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का? 114% नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते?

दुसरा ट्विट हल्ला

मुंबई पालिकेनं वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात 22 हजार 500 कोटी खर्च करुनही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा? वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले? मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले?

तिसरा ट्विट हल्ला

परिक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे? ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे? मुंबईत गेल्या 11 वर्षात 40 हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली ?

चौथा ट्विट हल्ला

कोस्टल रोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा? मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले? मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले? असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात,आम्ही ते विचारत राहू! कारण… प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही

शेलारांकडून एवढ्या प्रश्नांचा भडीमार झाल्यानंतर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी, पुन्हा 3-4 सवाल करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरलंच. आशिष शेलारांच्या ट्विटला उत्तर देताना, महापौर किशोरी पेडणेकरांनी पुन्हा भाजपची अक्कल काढली. मुख्यमंत्री बरोबर बोलत आहेत. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. 20 वर्ष सगळी पदं उपभोगली ना त्याचा हिशेब पण द्या, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (After the reaction of Chief Minister Uddhav Thackeray, Twitter attack by BJP leaders)

इतर बातम्या

Goa Elections 20022 : उत्पल पर्रिकरांच्या तिकीटावरून रणकंदन, परीकरांना कुणाची ऑफर? वाचा सविस्तर

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने; उड्डाणपुलावरुन श्रेयवाद, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Non Stop LIVE Update
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.