Corona Third Wave | Maharashtra Hotspot | संपूर्ण राज्यात महाराष्ट्र हॉटस्पॉट, 5 राज्य डेंजर झोनमध्ये

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळ या 5 राज्याच्या रुग्णसंख्येची तुलना संपूर्ण देशाच्या तुलनेत केली...तर 66 % रुग्ण याच 5 राज्यात आहेत...त्यातच संसर्गाचा वेग पाहता, यापुढंही रुग्णांमध्ये आणखी वाढ होईल असंच दिसतंय..

Corona Third Wave | Maharashtra Hotspot | संपूर्ण राज्यात महाराष्ट्र हॉटस्पॉट, 5 राज्य डेंजर झोनमध्ये
कोरोना

ओमिक्रॉन व्हेरियंटमुळं भारतात कोरोनाच्या संसर्गाचा विस्फोट झालाय.त्यामुळं सहाच दिवसात देशातली आकडेवारी 90 हजारांच्या घरात पोहोचलीय. तर चिंताजनक बाब म्हणजे, देशातला मोठा हॉटस्पॉट महाराष्ट्र आहे.

भारतात ओमिक्रॉनचा कहर, डेल्टापेक्षा वेगानं ओमिक्रॉनचा संसर्ग सुरु आहे. संसर्ग झालेल्या महाराष्ट्रासह 5 राज्यातच तब्बल 66 % नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळू आलेत. ओमिक्रॉन व्हेरियंटनं, असा काही धुमाकूळ घातलाय की, संपूर्ण भारतात नव्या वर्षाच्या अवघ्या सहाच दिवसांत, रुग्णांची संख्या तब्बल 90 हजार पार झालीय.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळ या 5 राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. संपूर्ण भारतात बुधवारी 90 हजार 941 रुग्णांची नोंद झालीय. यापैकी महाराष्ट्रातच सर्वाधिक रुग्ण आहेत..बुधवारी तब्बल 26 हजार 538 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. यापैकी मुंबईतच 15 हजार 166 रुग्ण आढळलेत. त्यामुळं महाराष्ट्रात हळूहळू निर्बंध लावण्यास सुरुवात झालीय.

महाराष्ट्रात 15 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयं बंद करण्यात आलेत. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबादमध्ये, नाशिकमध्ये पहिली ते 8 वी.पर्यंत शाळा बंद करण्यात आल्यात. इतर निर्बंधही लवकरच घोषित होणार आहेत

आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी म्हटलंय, की राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत तिसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरणा असून सध्या आढळणारे 80 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉनचे विषाणू आढळणारे रुग्ण आहेत. तर ओमिक्रॉनचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होतोय. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रानंतर, सर्वाधिक रुग्ण असलेलं राज्य आहे पश्चिम बंगाल.

पश्चिम बंगालमध्ये बुधवारी 14 हजार 22 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. आता निर्बंधांचा जर विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये शाळा, कॉलेज, विद्यापीठ, स्पा, ब्यूटी पार्लर आणि सार्वजनिक उद्यानं बंद करण्यात आलेत. शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये 50% उपस्थितीत असेल
5 जानेवारीपासून मुंबई आणि दिल्लीहून प.बंगालसाठी सोमवारी, मंगळवारीच विमानांचं उड्डाणं होतील, इतर दिवस बंद असेल. राजधानी दिल्लीचीही चिंता वाढलीय, कोरोनाच्या रुग्ण संख्येत सध्या दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे

बुधवारी दिल्लीत 10 हजारांचा टप्पा पार झाला, इथं 10 हजार 665 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. संसर्ग रोखण्यासाठी दिल्लीत विकेंड लॉकडाऊन लावण्यात आलाय. शनिवारी, रविवारी दिल्लीत अत्यावश्यक सेवा वगळता बंद असेल. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलंय. खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 % करण्यात आलीय. तर तामिळनाडूतही हळूहळू कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय.

तामिळनाडूत 4 हजार 862 नवे कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तामिळनाडूत सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. तर रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन असेल.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ होणाऱ्या राज्यांच्या यादीत केरळचाही समावेश आहे. कोरोनाला सुरुवात झाली, त्यावेळीही देशात सर्वात आधी केरळातच उद्रेक झाला होता. बुधवारी केरळमध्ये 4 हजार 801 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. केरळमध्ये लग्न समारंभ, अंत्यसंस्कार राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमासाठी 75 लोकांना परवानगी आहे.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळ या 5 राज्याच्या रुग्णसंख्येची तुलना संपूर्ण देशाच्या तुलनेत केली. तर 66 % रुग्ण याच 5 राज्यात आहेत. त्यातच संसर्गाचा वेग पाहता, यापुढंही रुग्णांमध्ये आणखी वाढ होईल असंच दिसतंय. ओमिक्रॉन व्हेरियंटमुळं भारतात कोरोनाच्या संसर्गाचा विस्फोट झालाय. त्यामुळं सहाच दिवसात देशातली आकडेवारी 90 हजारांच्या घरात पोहोचलीय..तर चिंताजनक बाब म्हणजे, देशातला मोठा हॉटस्पॉट महाराष्ट्र आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI