संजय राऊतांविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल, माफी मागा आणि मोकळे व्हा; भातखळकरांची ऑफर

| Updated on: Dec 13, 2021 | 10:38 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका आक्षेपार्ह शब्दावरुन त्यांच्याविरोधात राजनाधी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांना खुर्ची देतानाच्या राऊतांच्या फोटोवरुन भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

संजय राऊतांविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल, माफी मागा आणि मोकळे व्हा; भातखळकरांची ऑफर
संजय राऊत
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका आक्षेपार्ह शब्दावरुन त्यांच्याविरोधात राजनाधी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांना खुर्ची देतानाच्या राऊतांच्या फोटोवरुन भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी एका आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. मात्र, त्या शब्दाचा अर्थ मूर्ख असा होत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. मात्र, या शब्दप्रयोगावरुनच त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (File a case against Sanjay Raut in Delhi, apologize and be free; Atul Bhatkhalkar’s offer)

शरद पवार यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजपच्या काही नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं अशी भूमिका कायद्यासमोर चालत नाही, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला आहे, त्यामुळे त्यांनी आता पुढे जे आहे त्याला सामोरे जायला हवे, असे अतुल भातखळकर यांनी सांगितले आहे. यांचे म्हणजे आम्ही बोलू ते धोरण आणि बांधू ते तोरण असे आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तर राऊत यांनी माफी मागावी, असंही भातखळकर म्हणाले.

भाजपवरील टीकेवरुन, राजधानी दिल्लीत संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दिप्ती रावत यांनी राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर आपण जो शब्द वापरला, त्याचा अर्थ मूर्ख असा होतो. कोणत्याही शब्दकोशात त्याचा अर्थ मूर्ख असाच आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपकडून जशास तसं उत्तर

जे आशिष शेलारांचं मुंबईत झालं, तेच दिल्लीत संजय राऊतांचं, शेलारांनी महापौर पेडणेकरांबद्दल बोलताना आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यानंतर शिवसेनेची महिला आघाडी आणि भाजपची महिला आघाडी समोरासमोर आली. महिला शिवसैनिकांच्या तक्रारीनंतर शेलारांविरोधात तक्रार झाली. त्यामुळं इकडे शेलारांवर तक्रार दाखल झाल्याने भाजपने फिट्टमफाट केली का? अशीही टीका होतेय. तर भाजपनं राऊतांना एकप्रकारे ऑफरच दिलीय…माफी मागा आणि मोकळे व्हा, असं अतुल भातखळकर म्हणत आहेत.

राजकारणात टीका करताना, वापरले जाणारे शब्द तोलून मापून असावेत. बऱ्याचदा प्रकरण दिलगिरी या एका शब्दावरही मिटून जातात. मात्र राजकीय टक्कर तीव्र असेल तर प्रकरणं पोलीस स्टेशनपर्यंत कशी पोहोचतात हे शेलार आणि राऊतांच्या वक्तव्यांवरुन दिसून आलं आहे.

संजय राऊत यांचं ट्वीट

संजय राऊत यांच्या विधानावर भाजपने आक्षेप घेतला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. त्याच वेळी संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून Xतिया या शब्दाचा अर्थ सांगितला. आसाममध्ये हे आडनावच असल्याचं या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे.

शिवसेनाप्रमुखांचे संस्कार

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरू आहेत. त्यांनीच मला हा संस्कार दिला आहे. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही XXगिरी बंद करा. अशाने तुमचं महाराष्ट्रात कधीच राज्य येणार नाही. ही विकृती आहे. तुमच्या डोक्यातील हा कचरा तुम्ही साफ केला नाही, तर एखाद्या डंपिंगमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील. हे तुम्हाला मी आता सांगतो. पवारांसारख्या उंचीचे लोकं देशात आहे. त्यांना खुर्ची देणं यात काही वावगं नाही. हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असंही ते म्हणाले होते.

इतर बातम्या

Sharad pawar : पंतप्रधान पदावरून फडवीसांनी पवारांना डिवचले, फडणवीसांच्या टीकेनंतर चमत्कार घडतो-मविआ

‘सामना’त मोदींच्या काशी दौऱ्याबाबत एक शब्दही नाही, राहुल गांधींचं होय, मी हिंदू आहे फ्रंटपेजवर !

विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेसच का?, भाजपला पराभूत करण्याचा फॉर्म्युला काय?; प्रशांत किशोर यांनी सांगितलं सिक्रेट

(File a case against Sanjay Raut in Delhi, apologize and be free; Atul Bhatkhalkar’s offer)