VLOG : हनुमान दलित होता?

VLOG : हनुमान दलित होता?

हनुमान दलित होता, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटल्यानंतर, देशभरात एकच चर्चा सुरु झाली. हनुमान दलित नसून, आदिवासी होता, असे अनेकांनी मांडले. यावर पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’साठी व्हिडीओ ब्लॉगच्या माध्यमातून या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे :

‘वाल्मिकी रामायणा’मध्ये किष्किंधाकांड, युद्धकांड आणि उत्तराकांडमध्ये हनुमानाचा उल्लेख आहे. हनुमान हा अंजनीसुत वायुपुत्र होता. हनुमान हा आदिवासी होता. तो वनात रहाणारा होता. तो दलित नव्हता. खरं म्हणजे त्याची जात पहाण्यापेक्षा तो शूर, दक्ष, बलवान, राजनीतीतज्ञ, स्वामीनिष्ठ, पराक्रमी होता, हे पाहून त्याचा आदर्श ठेवावा असे मला वाटते. मुळात कुणाचीही जात पाहण्यापेक्षा त्याचे गुण पाहून, त्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा.

संपूर्ण व्हिडीओ ब्लॉग :