लेडी जोचं “विमान”घर, द लिटिल ट्रम्प…!!

| Updated on: May 17, 2021 | 7:37 PM

वादळ येतं आणि जो चं घर वादळात संपूर्ण उध्वस्त होतं. पुन्हा परतल्यानंतर उध्वस्त झालेल्या आपल्या घराचे अवशेष पाहून जो ला रडू कोसळतं. जो च्या नवऱ्याचा भाऊ एअर ट्रॅफिक कंन्ट्रोलर असतो, तो जो ला एक अनोखी आयडिया देतो. या आयडियातून जो विमानातच आपलं घर उभं करते

लेडी जोचं विमानघर, द लिटिल ट्रम्प...!!
woman converted plane into house
Follow us on

आज एक गंमतीशीर गोष्ट…जगात आपलं घर बांधताना कुणी उंचच उंच इमारत बांधून आकाशाला भेदण्याचा प्रयत्न केला तर कुणी नाईलाजास्तव छोट्याशा राहाट्यात समाधान मानलं. पण काही सो काॅल्ड घरं मात्र या सगळ्यापासून निराळीच.

ही घटना आहे अमेरिकातली. अमेरिकेत जो ही आपला नवरा आणि दोन मुलांबरोबर राहत असते. ते दोघंही एक सुंदर घर बांधण्यचं ठरवितात आणि बांधतातही. घर बांधून काही दिवस राहायला गेल्यानंतर जो हीच्या पतीचा दुर्दैवानं मृत्यू होतो. जो आता आपल्या दोन मुलांबरोबर त्या घरात राहू लागते. व्यवसायानं एक काॅस्मॅटीस्ट असणारी जो परिस्थितीनं सामान्यच असते.

नवरा गेल्यावंतर आपल्या नवऱ्याने बांधलेल्या घरातच तिचा व्यवसाय सुरु असतो आणि एकदा अचानक अमेरिकेत वादळ धडकणार असल्याची बातमी येते. प्रशासनाकडून सर्वांना हलवलं जातं. ती आपल्या मुलांना घेऊन जड पावलांनी आपलं घर सोडते.

वादळ येतं आणि जो चं घर वादळात संपूर्ण उध्वस्त होतं. पुन्हा परतल्यानंतर उध्वस्त झालेल्या आपल्या घराचे अवशेष पाहून जो ला रडू कोसळतं. सोबतीला दोन मुलं आणि समोर उध्वस्त झालेलं घर. जो आपल्या मुलांना आपल्या मित्राकडे ठेवून घरासाठी शोध सुरु करते. नवरा गेल्यानंतर नवऱ्यानं बांधलेलं घर पुन्हा उभं करणं जो ला शक्य नसतं.

जो च्या नवऱ्याचा भाऊ एअर ट्रॅफिक कंन्ट्रोलर असतो, तो जो ला एक अनोखी आयडीया देतो. ज्या विमानांचा कार्यकाळ संपत आलेला असतो त्यातलं एक पडतळीत विकत घेऊन त्यात घर तयार कर असं सांगतो. जो पहिल्यांदा ते पटत नाही पण नंतर ती एक विमान पाहायला जाते आणि त्या विमानाच्या प्रेमात पडते. ते असंत बोईंग ७२७. ती किमतीची चौकशी करते तेव्हा केवळ २००० डाॅलरमध्ये ते विमान मिळेल असं सांगितलं जातं.

५००० डाॅलरचं बजेट असणारी जो लगेचच ते विमान घ्यायचं पक्क करते. लगेचच ते विमान आपलं घर असलेल्या जागा ती घेऊन जाते, तिच्या घराच्या जागी असलेल्या तळ्याच्या काठावर एक मातीचा छोटा डोंगर करुन विमान तळ्याच्या अर्ध्यावर येईल असं उभं केलं जातं जणू काॅक्पिटमध्ये गेल्यावर विमान हवेत असल्याचा भास होईल.

woman converted plane into house

आता सुरु होते विमानातच्या आतल्या इंटिरिअरची बदला-बदली. खुर्च्या काढून टाकल्या जातात, हळू हळू विमानाच्या आतल्या विमान रचनेचा चेहरा मोहरा बदलला जातो.

जो नं विमानात आता अलिशान तीन बेडरुन, एक सुसज्ज स्वयंपाक घर, काॅक्पिटमध्ये टब बाथरुम, लिव्हिंग रुम, लाॅन्ड्री रुम, डायनिंग रुम, तयार केलंय. फक्त बदललं नाही ते विमानाचं टाॅयलेट. तीन बेडरुन पैकी एक मस्त वुडन फ्लोअरमध्ये बनवली गेलीय. विमानाच्या मध्यभागी जिथे सर्वात जास्त जागा असते तिथे हाॅलचा लुक दिला गेला. स्वयंपाक घरात फ्रीज, डिश वाॅशर, वाॅश बेसिन सर्वच सुंदररित्या बसवलंय.

जो नं विमानात सुंदर गालिचे, लिनोलियम, पडदे, गाद्या, सोफा सेट, टेबल-खुर्च्यांची मांडणी एका घरासारखीच केलीय. विमानाच्या चाकांपासून वर येणारा जिना चढवताना येणार्याची उत्कंठा पणाला लागते.

रितसर मिळालेल्या वीज कनेक्शनमधून संपूर्ण विमान “साॅरी”, सो काॅल्ड घर जो नं ए.सी. करुन टाकलंय. तलावाच्या काठावर पण अर्ध्यापर्यंत येऊन उभं केलेलं विमान लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. आज जो आणि तिची मुलंच नाही तर त्यांची मुलंही आजीच्या या विमान घरात राहायला येतात.

जो नं आपल्या या घराचं नाव लिटल ट्रम्प दिलंय कारण माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ॲच्युअल विमान जो च्या विमानासारखं बोईंग ७२७ आहे.

भारतासारख्या ठिकाणी अंबानींचं ॲन्टेलिया घर, शाहरुखचा जन्नत बंगला, अमिताभचा प्रतिभा बंगला ही सेलिब्रिटीच्या राहण्याची फेमस ठिकाणं पण जो सारख्या सामान्य स्त्रीचं घर अमेरिकेत फेमस आहे. आहे की नाही गंमत…..!!

प्रशांत कुबेर यांचे अन्य ब्लॉग

रॉयल एन्फिल्ड बुलेटचं मंदिर आणि त्यामागची रंजक कहाणी 

कुलधरा, एक शापित गाव, जिथे संध्याकाळी 6 नंतर कुणीही राहू शकत नाही!