Omicron : अखेर भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले, जगाची स्थिती काय?

| Updated on: Dec 02, 2021 | 9:04 PM

भारतात पहिल्यांदाच कर्नाटकमध्येही ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आलेत. 66 आणि 46 वर्षाच्या दोन व्यक्तींना ओमिक्रॉनचा संसर्ग झालाय. संसर्ग रोखण्यासाठीही अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) दिलीय. कर्नाटकमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.

Omicron : अखेर भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले, जगाची स्थिती काय?
कोरोना विषाणू.
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारने आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमायक्रॉन (Omicron) भारतात दाखल झाला आहे. भारतात पहिल्यांदाच कर्नाटकमध्येही ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आलेत. 66 आणि 46 वर्षाच्या दोन व्यक्तींना ओमिक्रॉनचा संसर्ग झालाय. संसर्ग रोखण्यासाठीही अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) दिलीय. कर्नाटकमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. तशी माहिती आरोग्य विभागाचे सचिव लव अगरवाल यांनी दिली आहे.

ओमिक्रॉनचे आतापर्यंत 52 म्युटेशन झाल्याची माहिती मिळतेय. अवघ्या काही दिवसात 29 देशात 373 रुग्ण ओमिक्रॉनबाधित आहेत. अमेरिकेत ओमिक्रॉन रुग्ण आढळल्यानंतर बायडेन यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिलेत. तसेच बूस्टर डोसही देण्यात येतोय.

29 देशात 373 रुग्ण ओमिक्रॉनबाधित

दक्षिण आफ्रिका – 183
घाना – 33
ब्रिटन – 32
बोत्सवाना – 19
नेदरलँड – 16
पोर्तुगाल – 13
जर्मनी – 9
ऑस्ट्रेलिया – 8
हाँगकाँग – 7
भारत – 2

दक्षिण आफ्रिकेत एकाच दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

ओमिक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्णांचा विस्फोट झालाय. दक्षिण आफ्रिकेत एकाच दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट झालीय. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेमध्ये करोनाबाधितांची संख्या 4 हजार 373 होती. ती बुधवारी दुपट्टीनं वाढून 8 हजार 561 वर गेली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा विस्फोट होत असल्यानं टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा किमान एका आठवड्यानं पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच दक्षिण कोरियातही ओमिक्रॉनमुळे परिस्थिती चिंताजनक होत आहे.

  • दक्षिण कोरियात एकाच दिवशी रेकॉर्डब्रेक 5 हजार कोरोनाबाधित
  • वाढत्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल फुल्ल
  • आयसीयूमध्ये फक्त 20 टक्के बेड शिल्लक

कोरोनासोबत जगाची वाटचाल सुरु

युरोपमध्येही कोरोनानं हाहाकार माजवलाय. गेल्या एका महिन्यात युरोपमध्ये मृत्युदरात दुप्पटीनं वाढ झाली आहे. ऑस्ट्रियामध्ये 11 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन लावण्यात तर नेदरलँडमध्ये आंशिक लॉकडाऊनचे नियम कडक केलेत. जर्मनीमध्ये गंभीर रुग्णांना एअर लिफ्ट करण्यात येत आहे. कोरोना संपणार नसल्यानं कोरोनासोबत राहत जगाची वाटचाल सुरू आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असतानाही कोरोनासंबंधी नियमपाळत फिनलँडमध्ये एका टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे फिडीमध्ये परदेशी पर्यटकांचं शानदार स्वागत करण्यात आलंय.

अनेक देशांनी लादलेल्या प्रवासी निर्बंधांवर WHO ची नाराजी

महामारीपासून जगाचा बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं एक मसुदा तयार करण्याचा निर्णयही घेतलाय. दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांनी ओमिक्रॉनबाधित देशांवर लादलेल्या प्रवासी निर्बंधांवरही जागतिक आरोग्य संघटनेनं नाराजी व्यक्त केलीय. जागतिक आरोग्य संघटनेनं फटकारल्यानंतर फ्रान्सने आफ्रिकेतील काही देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केलीय. तर जपाननं संपूर्ण आंतरराष्ट्रीय विमानसेवाच बंद केल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. जपानच्या पंतप्रधानांनी आता या निर्णयात फेरबदल करत परदेशात अडकलेल्या जपानी नागरिकांनी परत येण्यासाठी विमानसेवा सुरू केलीय.ओमिक्रॉनमुळे जपानचं अर्थचक्रही मंदावणार आहे. जपानमधील हिवाळ्यातील आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे.

ब्रिटनमधून एक आनंदाची बातमी

जगभरात ओमिक्रॉनमुळे दहशतीचं वातावरण असताना ब्रिटनमधून एक आनंदाची बातमी आलीय. गंभीर रुग्णांना अॅन्टीबॉडीवर आधारित औषधाला ग्रीन सिग्नल देण्यात आलाय. हे औषध ओमिक्रॉनबाधित रुग्णांवरही प्रभावी असल्याचा दावा करण्यात आलाय. औषधाचा एक डोस घेतल्यानंतर गंभीर रुग्णांमधील मृत्यूच्या दरात 80 टक्क्यांनी घट होते. तसेच रुग्णालय आणि हॉस्पिटलच्या इतर खर्चातही बचत होतेय. एक्सव्हुडी Xevudy हे कोरोनावरील रामबाण औषध आहे. कोरनाची लक्षणे आढळून आल्यानंतर पाच दिवसाच्या आत औषध घ्यावं लागणार आहे.

इतर बातम्या :

Omicron : ओमिक्रॉनचा धोका; महाराष्ट्र सरकारकडून नवी नियमावली जारी, कुठले नियम पाळावे लागणार?

मिर्झापूर-2 मधील ललित अर्थात ब्रह्मा मिश्राचा धक्कादायक मृत्यू, तीन दिवस बाथरूममध्येच मृतदेह पडून