Pravin Darekar: कधी मजूर तर कधी बिझनेसमन! 350 रुपये मजुरीवर काम केलंय दरेकरांनी! खरंच?

| Updated on: Apr 04, 2022 | 10:50 PM

नेमकं हे प्रकरण का चर्चेत आलं, आरोपांवर प्रवीण दरेकरांची बाजू काय आहे, आणि पोलीस चौकशीत त्यांना काय विचारलं गेलं, या सगळ्याची चर्चा होणं, स्वाभाविकच आहे. पण त्याहीपेक्षा हे प्रकरण समोर कसं आलं, हे समजून घेणं, जास्त गरजेतंय.

Pravin Darekar: कधी मजूर तर कधी बिझनेसमन! 350 रुपये मजुरीवर काम केलंय दरेकरांनी! खरंच?
प्रवीण दरेकरांना पुन्हा पोलिसांची नोटीस
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबै बँकेसाठी (Mumbai Bank) मजूर प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या प्रवीण दरेकरांच्या चौकशीला (Inquiry) सुरुवात झालीय. नेमकं हे प्रकरण का चर्चेत आलं, आरोपांवर प्रवीण दरेकरांची बाजू काय आहे, आणि पोलीस चौकशीत त्यांना काय विचारलं गेलं, यावरुन राजकारण तापलं होतं. त्यानंतर खुद्द दरेकरांनी (Pravin Darekar) पोलिसांनी नेमकं आपल्याला काय विचारलं, याबाबात स्वतः माहिती दिली. नेमकं दरेकरांनी यावेळी काय म्हटलं, ते जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओत पाहता येऊ शकेल. पण एक गोष्ट व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. प्रवीण दरेकरांना नेमका मजूर असण्याचा आरोप का झाला, हे आम्ही तुम्हाला उलगडून सांगणार आहोत. अगदी सोप्या भाषेत आणि सहज शब्दांत.. चला तर संपूर्ण प्रकरण मुद्देसूद समजून घेऊयात..

  1. गेल्या जानेवारी महिन्यात मुंबै बँकेच्या निवडणुका पार पडल्या.
  2. पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान प्रवीण दरेकर अनेक वर्षांपासून मजूर प्रवर्गातून अर्ज भरत होते
  3. दरेकरांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरल्यानं सहकार खात्यानं दरेकरांना नोटीस बजावली
  4. तुम्ही मजूर कसे आहात, हे सिद्ध करण्याचे आदेश दरेकरांना देण्यात आले.
  5. जेव्हा सहकार खात्यानं मजूर प्रकरणाचा तपास सुरु केला, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट समोर आली
  6. प्रतिज्ञा मजूर नावाच्या एका संस्थेच्या रजिस्टरमध्ये प्रवीण दरेकरांचा मजूर म्हणून उल्लेख असल्याचंही समोर आलं.
  7. मजुरीपोटी दरेकरांनी रोख रक्कम घेतल्याच्याही नोंदी आढलल्या.
  8. एप्रिल 2017 मध्ये दरेकरांनी 30 दिवस मजुरीचं काम केलं
  9. एका दिवसाची मजुरी म्हणून दरेकरांना 450 रुपये मिळाले
  10. महिनाभराच्या मजुरीचा मोबदला म्हणून दरेकरांना 13500 रुपये मजुरी दिली गेली
  11. नंतर डिसेंबर 2017 मध्येही दरेकरांनी 10 दिवस मजुरी केली
  12. यासाठी त्यांना एका दिवसाची मजुरी म्हणून 350 रुपये मिळाले

दरेकरांचं स्पष्टीकरण

आता या सगळ्या प्रकरणानंतर दरेकरांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरणही दिलंय. त्यांनी म्हटलंय की

एखाद्या मजूर संस्थेने ठराव मंजूर केल्यानंतरच संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क मिळतो. मी जेव्हा मजूर संस्थेत सभासद झालो तेव्हा मी अंगमेहनीतचे काम करायचो. मी रोजगार हमी योजनेवरही काम केले आहे. इतकंच काय मी बोरिवली तहसील कार्यालयातून मजूर असल्याचा दाखलाही घेतला होता. मजुरांनी प्रगती करू नये, आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ नये, असे कुठल्या कायद्यात लिहलेले नाही.

आता नेमका आक्षेप का आहे?

  1. दरेकरांनी मुंबै बँकेची निवडणूक लढवताना मजूर प्रवर्गातून लढवली
  2. पण विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी उपजिवीकेचं साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय दाखवला
  3. सहकार खात्याच्या आक्षेपानुसार प्रतिज्ञापत्रातली दरेकरांची मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये इतकी आहे.
  4. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांना महिन्याला दीड ते दोन लाखांचं मासिक वेतनही मिळतंय
  5. मग तरी प्रवीण दरेकर मजूरीप्रवर्गातून सदस्यत्व कसं मिळवत राहिले? हा प्रश्न आहे.

पाहा tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट :