AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pravin Darekar: नियमबाह्य प्रश्न विचारले, पोलिसांवर दबाव होता, प्रवीण दरेकर यांचा दावा

माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. सभादसदत्वा संदर्भात काही प्रश्न विचारले गेले. बँकेकडून (bank) काही लाभ घेतला गेला का? याबाबतही तीन तासात विचारणा करण्यात आली.

Pravin Darekar: नियमबाह्य प्रश्न विचारले, पोलिसांवर दबाव होता, प्रवीण दरेकर यांचा दावा
प्रवीण दरेकर Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 3:29 PM
Share

मुंबई: माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. सभादसदत्वा संदर्भात काही प्रश्न विचारले गेले. बँकेकडून (bank) काही लाभ घेतला गेला का? याबाबतही तीन तासात विचारणा करण्यात आली. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. नोटीस पाठवून जवाब घ्या, असं आम्ही पहिल्या दिवसापासून वारंवार सांगत होतो. शेवटी 41 ए अंतर्गत नोटीस पाठवणं अपेक्षित होतं, आमची भूमिका पोलिसांकडे गेली पाहिजे त्याची माहिती पोलिसांना (mumbai police) दिली. तेच तेच प्रश्न विचारून मला भांडावून सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ज्याची नियत साफ आहे, ज्याचं दामन साफ आहे त्याला त्रास होत नाही. जे जे विचारले त्याची उत्तरे दिली. यावेळी मला बरेचशे नियमबाह्य प्रश्न विचारले गेले. इतर संस्था आणि मजूर या संदर्भातील हे प्रकरण असताना इतर संस्था आणि फेडरल बँकेबाबत प्रश्न विचारण्यात आले होते, असं सांगतानाच यावेळी पोलिसांवर दबाव असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली. मुंबई बँक घोटाळ्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यांची नियत, दामन साफ आहे त्याच्यावर परिणाम होत नाही. मुद्देसुद तपशीलवार जे जे विचारलं त्याची माहिती दिली. बरेचसे नियमबाह्य प्रश्न विचारले गेले. तपासाअंतर्गत येणारी सर्व माहिती पोलिसांना दिली. तपासाच्या दरम्यान स्वत: मुंबईचे पोलीस आयुक्त मॉनिटर करत होते. त्यांचा दबाव असल्याचं दिसत होतं. अधिकाऱ्यांनी सखोल माहिती घेतली. त्यांना जी माहिती हवी होती ती त्यांना दिली, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

फोन येत होते, पण कुणाचे माहीत नाही

पोलिसांना कुणाचे फोन येत होते का? असा सवाल करण्यात आला असता, चार पाच वेळा पीआय आतमध्ये गेले. अँटीचेंबरमध्ये गेले आणि नंतर बाहेर गेले. नेमके कुणाचे फोन होते ते माहीत नाही. पण सहा ते सात वेळा ते बाहेर गेले हे खरे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव

पोलिसांनी आवश्यकता वाटल्यास बोलवू असं स्पष्ट केलंय. पोलिसांनी पुन्हा बोलावलं तर मी जाईन. त्यांना जी जी माहिती हवी असेल, जेव्हा जेव्हा बोलावतील तेव्हा मी जाईन. पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव आहे. सरकारी कार्यालयातून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आणि पुढची कारवाई करण्या संदर्भात दबाव असल्याचं दिसत होतं, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Nitesh Rane: राऊतांसारख्या राष्ट्रवादीच्या भोंग्याला किती महत्त्व द्यायचं?; नितेश राणेंचा सवाल

Maharashtra News Live Update : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद, पर्यायी इंधन परिषदेत मुख्यमंत्री ठाकरेंचा संवाद

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.