सहा वर्षीय मुलीकडून वजीर सुळका सर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी दक्षिणोत्तर पसरलेला माहुली किल्ला आणि त्याच्या दक्षिणेकडील टोकाला (वासिंद रेल्वे स्थानकाच्या दिशेला) मुख्य डोंगररांगेपासून सुटलेला वजीर सुळका. ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागातील माहुली किल्ला परिसरात असलेल्या चंदेरी दक्षिण गटातील वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून 3 तासांची अतिशय दमछाक करणारी चढाई करावी लागते. त्याच्या […]

सहा वर्षीय मुलीकडून वजीर सुळका सर
Follow us on

सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी

दक्षिणोत्तर पसरलेला माहुली किल्ला आणि त्याच्या दक्षिणेकडील टोकाला (वासिंद रेल्वे स्थानकाच्या दिशेला) मुख्य डोंगररांगेपासून सुटलेला वजीर सुळका. ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागातील माहुली किल्ला परिसरात असलेल्या चंदेरी दक्षिण गटातील वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून 3 तासांची अतिशय दमछाक करणारी चढाई करावी लागते. त्याच्या पायथ्याशी येणे हे ही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे.

दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी गवताळ पाऊलवाट, दोन्ही बाजूस खोल दरी, पाठीवरील अवजड ओझे यातून जरा जरी पाऊल घसरले तरी दरीच्या जबड्यातच विश्रांती! पाण्याची प्रचंड कमतरता व त्यानंतर वजीर सुळक्याची 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई. याच्या पूर्वेकडील दरीचा उतार तर 600 फुटांचा आहे.

प्रत्येक प्रस्तारारोहकाच स्वप्न म्हणजे वजीर सुळक्याचा माथा. या सुळक्याविषयी दुर्गप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहल आहे ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे.

गिरीजाने आताच २५-२८ ऑक्टोबर मध्ये नाशिक गडकोट वारी करत ४ दिवसात नाशिकमधील तब्बल १२ किल्ले पादाक्रांत करुन आपली ५१ वी दुर्ग भरारी भटकंती पुर्ण केली…

गेल्या वर्षी सर्वात कमी वयात लिंगाणा सर करणारी पहिलीच मुलगी असा मान मिळवुन त्याचीच वर्षपुर्ती म्हणुन आणि बालदिनाचे औचित्य साधुन १० नोव्हेंबर या शिवप्रताप दिनाच्या मुहुर्तावर वजीर सुळका सर करायची मोहीम आखली होती… या मोहीमेदरम्यान वजीर सुळक्यावरुन तीने पुन्हा भारताचा तिरंगा फडकवुन लेक वाचवा, लेक जगवा, लेक वाढवा हा संदेश दिला आहे. या मोहीमेत तिचे वडील धनाजी लांडगे स्वतः तिच्यासोबत होते.