AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक कादंबरी, 12 प्रकाशकांनी नाकारली, प्रकाशित झाली तर दुनिया बदलून टाकली, वाचा आयन रँडच्या द फाऊंटनहेडबद्दल सविस्तर…

जो इंग्रजी साहित्य वाचतो, त्यानं द फाऊंटनहेड (The Fountainhead) वाचली नसेल असा वाचक विरळच. जवळपास 75 वर्षानंतरही कादंबरी छपाईत आहे. जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये तिच्या कित्येक आवृत्त्या निघाल्या आणि अजूनही निघत आहेत.

एक कादंबरी, 12 प्रकाशकांनी नाकारली, प्रकाशित झाली तर दुनिया बदलून टाकली, वाचा आयन रँडच्या द फाऊंटनहेडबद्दल सविस्तर...
The Fountainhead
| Updated on: Mar 04, 2021 | 6:36 PM
Share

मुंबई : जो इंग्रजी साहित्य वाचतो, त्यानं द फाऊंटनहेड (The Fountainhead) वाचली नसेल असा वाचक विरळच. जवळपास 75 वर्षानंतरही कादंबरी छपाईत आहे. जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये तिच्या कित्येक आवृत्त्या निघाल्या आणि अजूनही निघत आहेत. 70 लाखाहून अधिक प्रती छापल्या गेल्यात. म्हणजे प्रकाशनापासून ते आतापर्यंत असा काळ मोजला तर वर्षाला लाख प्रती अजूनही त्याच्या विकल्या जातात. ही सर्व जादू आयन रँडच्या (Ayn Rand) लिखानाची तर आहेच पण  फाऊंटनहेडमध्ये जो विचार मांडला गेलाय तो काळाच्या कसोटीवर आणखीनच उजळून निघतोय. म्हणून द फाऊंटनहेड तुम्ही वाचली नसेल तर तातडीनं मिळवा आणि वाचून काढा. ती वाचण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत, तुम्ही सुरुवात करा, ती शेवटपर्यंत तुम्हाला पकडून ठेवेन. (The Fountainhead is a 1943 novel by Russian-American author Ayn Rand)

कादंबरीचं कथानक काय आहे?

द फाऊंटनहेडची गोष्ट आहे एका तत्वनिष्ठ तरुण आर्किटेक्टची. हॉवर्ड रॉर्क (Howard Roark) त्याचं नाव. दुनियादारीच्या प्रस्थापित मुल्यांना तो आव्हान देत रहातो, त्याचा संघर्ष आपल्याला प्रेमात पाडतो. कुठल्याच स्थितीत स्वत:च्या मुल्यांशी तडजोड न करणाऱ्या रॉर्कचा आपल्याला कधी राग येतो तर कधी त्याच्याबद्दल वाचता वाचता डोळ्यात पाणीही जमा होतं. कादंबरीत डोमनिकही आहे. ती या कादंबरीची नायिका. ती रॉर्कच्या विरोधातही आहे आणि त्याच वेळेस त्याला जपण्यासाठी वाट्टेल ते करायला तयारही आहे. तिच्या प्रेमाची तऱ्हा कादंबरीच्या केंद्रस्थानीही आहे. कादंबरीत पीटर कीटिंग आहे, टुही आहे आणि तशी कित्येक पात्रं. ती वाचताना आपल्या आजुबाजला वावरणारी माणसं आपल्याला नव्यानं दिसायला लागतात.

द फाऊंटनहेडला यश कशामुळे मिळालं?

कुठल्याही कादंबरीत एक ड्रामा असतो, पात्रं असतात, काही घटना असतात. द फाऊंटनहेडमध्येही ते सर्व काही आहे. म्हटलं तर एखाद्या क्राईम थ्रिलर लाजवेल असा मसाला ह्या कादंबरीत आहे. पण त्यामुळे ही कादंबरी पिढ्यान पिढ्या टिकून राहीलेली नाही. तुम्ही कल्पना करा, 1943 साली ती प्रकाशित झाली आणि अजूनही तिच्या आवृत्त्या निघतात म्हणजे तिच्यात काही तरी खास आहे, जे वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक वातावरणात वाढणाऱ्यांनाही ती आपलसं करते. ती एक गोष्ट कुठली आहे, तर तो आहे द फाऊंटनहेडमध्ये मांडला गेलेला विचार. तो विचार आहे मुक्ततेचा. व्यक्ती केंद्रीत व्यवस्थेचा. व्यक्तीवादाचा. ऑबजेक्टिव्हिझमचा. वस्तुनिष्ठतेचा. कादंबरी प्रकाशित झाली तेव्हापासून जगानं साम्यवाद बघितला, अनुभवला, समाजवादी अर्थव्यवस्था अनुभवल्या, पहिलं, दुसरं महायुद्ध पाहिलं, शीतयुद्धाचे दिवस बघितले आणि आता मुक्त अर्थव्यवस्थेचही आपण अनुभवतोच आहोत. ह्या सगळ्या काळाला पुरुन उरलीय ती आयन रँडची द फाऊंटनहेड. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यातला मुक्ततेचा विचार.

आयन रँडच्या आयुष्याविषयी

आयन ही जन्माने रशियन. तिचा जन्म 1905 सालचा. ऐन तारुण्यात तिनं साम्यवादी क्रांती अनुभवली. घरात उपासमारीचे दिवस  पाहिले. त्याच वेळेस अमेरिकन स्वातंत्र्यबद्दल तिच्या वाचण्यात आलं आणि शेवटी 1925 साली तिनं रशियाला टाटा करत अमेरिकेत पाऊल ठेवलं ते कधीच न परतण्यासाठी. नंतर ती पुढं हॉलीवुडमध्ये पटकथा लिखानासाठी आली. तिथंच तिची ओळख अभिनेता फ्रँक ओकॉनरशी झाली. नंतर दोघांनी लग्न केलं आणि फ्रँकच्या निधनापर्यंत म्हणजे जवळपास पन्नासवर्षाहून अधिक काळ ते एकत्र राहीले. पुस्तक समर्पणाच्या विरोधात असलेल्या आयन रँडनं, द फाऊंटनहेड मात्र फ्रँकला समर्पित केलेली आहे. त्याचं कारण तिनं कादंबरीला पंचवीस वर्षे झाली त्यावेळेस विशेष मनोगत लिहिलेलं आहे, त्यात विस्तारानं सांगितलं आहे. तेही आवर्जून वाचा. त्यात फाऊंटनहेडच्या निर्मितीची कथा उलगडत जाते.

आयन रँडच्या इतरही साहित्यकृती

आयन रँडची ओळख फक्त द फाऊंटनहेडची लेखिका एवढीच नाही. तिनं लिहिलेली अॅटलस श्रग्ड (Atlas Shrugged) ही कादंबरीसुद्धा तेवढीच गाजली. हजार पानापेक्षा मोठा तिचा पसारा आहे. 1957 मध्ये ती प्रकाशित झाली म्हणजे द फाऊंटनहेडनंतर जवळपास 17 वर्षांनी. अॅटलस श्रग्ड वाचून अनेकांना निराश वाटलं. ती कादंबरीही मजबूत आहे पण फाऊंटनहेडसारखी ती भिडायला सांगत नाही असा काहींचा आक्षेप होता. पण अनेक जण सांगतात की तुम्ही आधी अॅटलस श्रग्ड वाचा आणि नंतर फाऊंटनहेड म्हणजे तुम्हाला एका परिपूर्णतेचा आनंद येईल. ते उलटं झालं तर गोंधळ होण्याची शक्यता जास्त. आयन रँडनं नॉन फिक्शनही मोठ्या प्रमाणात लिहलंय पण तिची खरी ओळख आहे ती तिनं लिहिलेल्या द फाऊंटनहेड आणि अॅटलस श्रग्ड या दोन कादंबऱ्यांमुळेच.

मराठीत उपलब्ध आहे का?

होय, द फाऊंटनहेडचा मराठीत अनुवाद करण्यात आलेला आहे आणि डायमंड पब्लिकेशन्स (Diomand Publications) ती प्रकाशित केलीय. मुग्धा कर्णिक (Mugdha Karnik) यांनी ती अनुवादित केली आहे. अनुवादही उत्तम झाला आहे. पण ज्यांना इंग्रजी वाचनाची सवय आहे त्यांनी मुळ भाषेत ती वाचली तर त्याचा आनंद अधिक. इंग्रजीतल्या प्रती बहुतांश ठिकाणी उपलब्ध आहेत. अगदी मुंबई, (Mumbai) पुण्यासारख्या (Pune) शहरात ती रस्त्याच्या कडेला लागलेल्या बुक स्टॉलवरही मिळू शकते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.