tv9 Marathi Special : गाता गाता, हसता हसता हार्ट अटॅक कसा येतो? परभणीतली संगीताबाई असो की केके, ते 5 व्हिडीओ

| Updated on: Jun 01, 2022 | 4:01 PM

मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही. मृत्यू अटळ आहे. एखादी व्यक्ती प्रदीर्घ आजाराने मृत्यू (Death) पावल्यास सुटला असं म्हटलं जातं. मात्र, गाता गाता, हसता हसता, खेळता खेळता मृत्यू आला तर तो अधिक दु:खद ठरतो.

tv9 Marathi Special : गाता गाता, हसता हसता हार्ट अटॅक कसा येतो? परभणीतली संगीताबाई असो की केके, ते 5 व्हिडीओ
हृदयविकारने मृत्यू, गायक केके, ताजोद्दीन महाराज शेख, संगीता गव्हाणे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही. मृत्यू अटळ आहे. एखादी व्यक्ती प्रदीर्घ आजाराने मृत्यू (Death) पावल्यास सुटला असं म्हटलं जातं. मात्र, गाता गाता, हसता हसता, खेळता खेळता मृत्यू आला तर तो अधिक दु:खद ठरतो. सुप्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar kunnath) उर्फ केके याचा मृत्यू त्याच्या कोट्यवधी चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. कोलकातामधील एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान केकेला अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे (Heart Attack) त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद करत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

केकेच्या मृत्यूनंतर आता अनेक गोष्टी तपासल्या जातील. पोलीस तपासात जे समोर येईल ते येईल. मात्र, एका सुप्रसिद्ध गायकानं गाता गाता अशी एक्झिट घेणं धक्कादायक आहे. मृत्यू किती अनिश्चित आहे याचाच प्रत्यय केकेच्या मृत्यूने आलाय. त्या लाईव्ह कॉन्सर्टमधील काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यात केके गाण गात असताना अस्वस्थ झाल्याचं पाहयला मिळत आहे. तो वारंवार रुमालाने घाम पुसतोय. तसंच एसी बंद असल्याबाबत तक्रारही करताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये त्याला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

संगिता गव्हाणे यांचा गाणं गाता गाता मृत्यू

25 मे रोजी असाच एक हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला होता. परभणीमध्ये एका लग्न सोहळ्यात गाताना एका महिलेचा मृत्यू झाला. संगीता गव्हाणे असं त्यांचं नाव होतं. संगीता गव्हाणे हा होमगार्ड होत्या. तसंच त्यांना गाण्याचीही आवड होती. परभणीच्या पाथरी रोडवर एका लग्नसोहळ्यात त्या सहभागी झाल्या होत्या. नवरदेवाची मिरवणूक सुरु होती. वऱ्हाडी मंडळी नाचण्यात दंग होते. त्याचवेळी संगीता गव्हाणे गाण गाता गाता जमिनीवर पडल्या आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला होता.

ताजोद्दीन महाराज शेख यांनी कीर्तनातच देह ठेवला

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांनीही कीर्तन सुरु असताना व्यासपीठावरच देह ठेवला. 27 सप्टेंबर 2021 रोजी ताजोद्दिन बाबा धुळे जिल्ह्यतील साक्री तालुक्यात जामदे गावात कीर्तन करत होते. कीर्तन ऐन रंगात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. कीर्तनात उपस्थित स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी नंदुरबारला नेलं असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झला. महत्वाची बाब म्हणजे ताजोद्दीन महाराज शेख यांनी मृत्यूच्या वर्षभरापूर्वीच मला कीर्तन करताना मरण आले तर माझ्या सारखा भाग्यवान मीच असेल, असं वक्तव्य केलं होतं.

मल्याळम गायक एडवा बशीर यांचा लाईव्ह कार्यक्रमात मृत्यू

दोन दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध गायकाचाही कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठावरच मृत्यू झाला होता. मल्याळम गायक एडवा बशीर यांचा लाईव्ह शो सुरु होता. गाण सुरु असतानाच ते स्टेजवर कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एडवा बशीर यांनी अनेक मल्याळण सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. शनिवारी केरळच्या अलाप्पुझा इथे ब्लू डायमंड ऑर्केस्ट्रा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. माना हो तुम बेहद हसी हे गाणं त्यांनी गायलं. मात्र, गाणं गात असतानाच ते स्टेजवर कोसळले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.

दशावतारातील कलाकार स्टेजवरच कोसळला

सिंधुदुर्गात दशावतार नाट्यप्रयोग सुरु असतानाच एका कलाकाराला हृदयविकाराचा झटका आला. अस्वस्थ झालेला तो कलाकार स्टेजवरच कोसळल्याची घटना 11 एप्रिल 2022 रोजी घडली होती. सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सिंधुदुर्गातील रेडी इथं ही घटना घडली. हार्ट अटॅक आल्यानंतर कोसळलेल्या कलाकाराला तातडीने जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं. त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. नाट्यप्रयोग सुरु असतानाच कलाकार कोसळतो तो व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद झाला होता.