
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी अमेरिका दौऱ्याहून भारतात परतरणार आहेत. अमेरिकेत त्यांनी अनेक व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी अनेकांनी त्यांना भेटवस्तू दिल्या.

पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये 157 प्राचीन कलाकृती आणि वस्तूंचा समावेश आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की यातील बहुतेक कलाकृती आणि वस्तू 11 व्या ते 14 व्या शतकातील आहेत. पंतप्रधान मोदींनी या भेटवस्तुंसाठी अमेरिकेचे आभार मानले.

यामध्ये नक्षीकाम केलेल्या वस्तूंसह नटराजाच्या मूर्तीचा समावेश आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, यापैकी बहुतांश वस्तू 11 व्या ते 14 व्या शतकातील आहेत. पंतप्रधान मोदी प्राचीन कलाकृती न्याहाळताना.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरला होता. संपूर्ण जगाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले होते.