‘शोले’चा रेकॉर्ड मोडणारा 42 वर्षांपूर्वीचा चित्रपट, बजेटपेक्षा 100 पट अधिक केलेली कमाई, आजही लोक….

42 वर्षांपूर्वीचा 1 तास 49 मिनिटांचा चित्रपट, ज्याने प्रदर्शित होताच 'शोले'चा मोडला होता रेकॉर्ड. सर्वात कमी बजेटमध्ये केली होती प्रचंड कमाई. चित्रपटातील 6 गाण्यांनी रचला होता इतिहास.

| Updated on: May 12, 2026 | 1:45 PM
1 / 5
Biggest Blockbuster Film: 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटसृष्टीत हिंदी चित्रपटांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर होती. त्या काळात प्रादेशिक सिनेमाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. मात्र गावाकडील प्रेक्षक आणि छोट्या शहरांमध्ये प्रादेशिक भाषांतील चित्रपटांना मोठी पसंती मिळत होती. कमी बजेट, मर्यादित साधनं आणि साधी मांडणी असूनही या चित्रपटांनी लोकांच्या मनावर राज्य केलं.

2 / 5
अशाच एका हरियाणवी चित्रपटाने 1984 मध्ये प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. या चित्रपटाने केवळ कमाईचे विक्रम मोडले नाहीत तर त्या काळातील मोठ्या हिंदी चित्रपटांनाही मागे टाकलं. या चित्रपटाचं नाव आहे 'चंद्रावल'.

3 / 5
1980 च्या दशकात तयार होणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये गाव, समाज, नाती आणि पारंपरिक मूल्यांचं वास्तववादी चित्रण केलं जात होतं. प्रेम, जातीय भेद, सामाजिक संघर्ष आणि सन्मान अशा विषयांवर आधारित कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत असत.

4 / 5
चंद्रावल हा त्याच काळातील एक अत्यंत गाजलेला चित्रपट ठरला. चित्रपटाची कथा गाडिया लोहार समाजातील चंद्रावल नावाच्या तरुणीभोवती फिरते. चंद्रावल आणि सूरज हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र ते वेगवेगळ्या समाजातील असल्यामुळे त्यांच्या नात्याला मोठा विरोध सहन करावा लागतो.

5 / 5
त्या काळात कोणतीही प्रादेशिक चित्रपट इतकी मोठी कमाई करू शकेल याची कल्पनाही अनेकांना नव्हती. मात्र चंद्रावल ने सर्वांना आश्चर्यचकित केलं. अनेक ठिकाणी या चित्रपटाने शोले सारख्या सुपरहिट चित्रपटांचे विक्रम मोडल्याची चर्चा झाली होती. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट अवघ्या 5 ते 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र रिलीज झाल्यानंतर त्याने 5 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

Follow Us