13 वर्षांपासून अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे हे गाणं, ऐकताच गुणगुणतात लोक, आजही क्रेझ कायम
13 वर्षांपासून अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे हे चटपटीत गाणं, शब्द ऐकताच गुणगुणतात लोक. आजही हे गाणं आहे प्रचंड सुपरहिट, तुम्ही ऐकलं का?

बॉलिवूडमध्ये अनेक गाणी येतात आणि जातात, मात्र काही गाणी अशी असतात की त्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे टिकून राहते. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आर... राजकुमार' या चित्रपटातील ‘कद्दू कटेगा तो सब में बटेगा’ हे गाणे त्यापैकीच एक आहे.

रिलीज झाल्यानंतर हे गाणे प्रचंड गाजले होते आणि आजही लग्नसमारंभ, पार्ट्या तसेच सोशल मीडियावरील रील्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या गाण्याला प्रसिद्ध गायिका अंतरा मित्रा यांनी आवाज दिला असून संगीत प्रीतम चक्रवर्ती यांनी दिले आहे.

हे गाणे प्रामुख्याने सोनू सूदवर चित्रित करण्यात आले असून त्यामध्ये शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हाची झलक पाहायला मिळली. गाण्यातील दमदार नृत्य, आकर्षक संगीत आणि मनोरंजक सादरीकरणामुळे ते त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते.

सुमारे 70 ते 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठे यश मिळवले. चित्रपटातील गाणी, कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

आज, तब्बल 13 वर्षांनंतरही ‘कद्दू कटेगा तो सब में बटेगा’ हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे. यूट्यूबवरील कोट्यवधी व्ह्यूज आणि सोशल मीडियावरील सातत्याने होणारा वापर यामुळे या गाण्याची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे दिसून येते.