
अमरावती जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तसेच अवकाळी पावसामुळे देखील नुकसान झालं.

मात्र पीक विमा काढूनही विविध कारणे देऊन अमरावती जिल्ह्यातील 24 हजार शेतकऱ्यांना पिक विम्यात अपात्र करण्यात आले आहे.

अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही, त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आलं.

पीक विमा कंपनीला कृषी विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला, त्यामुळे पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे व अपात्र शेतकऱ्यांना पात्र करून शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.

दरम्यान यावेळी गेल्या दोन तासापासून कृषी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे .