
Sunny Deol Border Collection : सनी देओलचा समावेश बॉलिवूडच्या दिग्गजांमध्ये होतो. मागच्या 43 वर्षांपासून तो फिल्म इंडस्ट्रीत काम करतोय. आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक उत्तम चित्रपट इंडस्ट्री आणि प्रेक्षकांना दिले आहेत. बॉर्डर हा त्याच्या करिअरमधील शानदार चित्रपटापैकी एक आहे.

'बॉर्डर' सिनेमा 1997 साली रिलीज झालेला. जेपी दत्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. सनी देओलच्या अभिनयाचं त्यावेळी भरपूर कौतुक झालेलं. आता 29 वर्षानंतर त्याच चित्रपटाचा सीक्वल बॉर्डर 2 आलाय. या चित्रपटातही प्रेक्षकांना सनी देओलचं काम आवडतय.

'बॉर्डर 2' ला ऑडियंसचा शानदार रिस्पॉन्स मिळाला आहे. हा चित्रपट सुद्धा बॉक्स ऑफिस वर ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला माहितीय का? 29 वर्षांपूर्वी आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाने किती कमाई केली होती? चला जाणून घेऊया.

'बॉर्डर 2' मध्ये सनी देओल सोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहे. पहिल्या पार्टमध्ये सनीसोबत सुनील शेट्टी, सुदेश बेरी, जॅकी श्रॉफ आणि अक्षय खन्ना होते. सर्व स्टार्सनी मिळून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.

बॉक्स ऑफिस इंडियानुसार पहिला 'बॉर्डर' चित्रपट बनवायला 10 कोटी रुपये खर्च आला होता. फिल्मने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस वर आपल्या बजेटपेक्षा साडे सहापट जास्त कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने 65.57 कोटींचा व्यवसाय केला होता. बॉर्डर 2 च बजेट 200 कोटी रुपये असल्याचं बोललं जातय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली आहे.