32 वर्षांपूर्वीच सर्वात रोमँटिक गाणं, ज्याने तोडले सर्व रेकॉर्ड, आजही ऐकलं तरी लोक दिवसभर गुनगुनतात
90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात रोमँटिक गाणं, जे आजही प्रेक्षक पाहताना पूर्णपणे त्या गाण्यामध्ये हरवून जातात. एकदा ऐकलं तरी लोक हे गाणं दिवसभर गुनगुनतात.

90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक रोमँटिक गाणी प्रदर्शित झाली होती. त्या काळातील गाणी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडायची. रेडिओ, टेलिव्हिजन किंवा कॅसेटवर लोक तासन्तास ही गाणी ऐकायची.

असचं एक 90 च्या दशकातील रोमँटिक गाणं जे प्रेक्षकांच्या हृदयावर आजही घर करून बसलं आहे. हे गाणं त्या काळात प्रत्येकाच्या तोंडावर फक्त ‘टिप-टिप बरसा पाणी’ हेच गाणं असायचं.

हे गाणं सुपरहिट चित्रपट ‘मोहरा’ मध्ये चित्रित करण्यात आले होते. या गाण्यात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जबरदस्त केमिस्ट्री होती. पावसात शूट केलेले हे गाणं प्रदर्शित झाल्यावर चर्चेत राहिले. विशेषतः रवीना टंडनच्या पिवळ्या साडीतला लुक आजही लोकांच्या आठवणीत आहे.

रिलीज झाल्यापासून 32 वर्षे उलटली तरीही या गाण्याची लोकप्रियता टिकून आहे. हे गाणं आजही पार्ट्या, लग्नसोहळे, सोशल मीडियावरील रील्स आणि व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळते.

यूट्यूबवरही हे गाणं कोट्यवधी वेळा पाहिले गेले आहे. 90 च्या दशकातील गाणी आवडणारे लोक अजूनही या गाण्यावर प्रेम करतात, तसेच नव्या पिढीला हे गाणं खूप आवडते.