
अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आहे. आधी साऊथचा सुपरस्टार धनुषला डेट करण्यासाठी तिचं नाव समोर आलेलं. आता बिपाशा बसूला बॉडीशेम करण्यासाठी मृणाल ट्रोल होत आहे. मृणालचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हिडिओमध्ये मृणाल बोलताना दिसते, मी बिपाशापेक्षा जास्त सुंदर दिसते. असं म्हटलं जातय की, हा व्हिडिओ मृणालच्या टीव्हीच्या सुरुवातीच्या दिवसांमधला आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हणतो, मी बिपाशाला आयडलाइज करतो. त्यावर मृणाल त्याला उत्तर देते की, पुरुषांसारख्या दिसणाऱ्या मुलीबरोबर तुला लग्न करायचं आहे का?. जा करं बिपाशाशी लग्न. तिचे स्नायू पुरुषांसारखे दिसतात. त्यानंतर मृणाल स्वत:ला बिपाशासोबत कम्पेयर करते.

ऐक, मी बिपाशापेक्षा जास्त सुंदर दिसते. त्यावरुन मृणाल आणि बिपाशाचे फॅन्स आपसात भिडले आहेत.

अलीकडेच मृणालने स्वत:चे ब्लॅक ड्रेसमधले काही फोटो शेअर केलेत. त्यावरुन बिपाशाचे चाहते तिला ट्रोल करतायत. काहीजण तिला बॉडीशेम सुद्धा करतायत. (Mrunal Thakur All photos Instagram)