399 रुपये देऊन या अभिनेत्रीला बघतात लोक, कोण आहे ही अभिनेत्री? सौंदर्य पाहून म्हणाल…,
इंडस्ट्रीमधील अशी एक अभिनेत्री जिला पाहण्यासाठी लोक देतात 399 रुपये. तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ.

तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि मॉडेल अभिरामी वेंकटचलम सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिच्या एका स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे इंटरनेटवर मोठी चर्चा रंगली आहे. काही सब्सक्राइबर्सकडून अश्लील स्वरूपाच्या कंटेंटची मागणी होत असल्याने अभिरामीने संताप व्यक्त केला आहे.

अभिरामीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे स्पष्ट शब्दांत सांगितलं की तिचा सब्सक्रिप्शन बेस्ड प्लॅटफॉर्म हा कोणताही अश्लील किंवा एडल्ट कंटेंट देण्यासाठी नाही. तिने म्हटलं की ती आपल्या चाहत्यांसाठी क्रिएटिव्ह आणि वेगळ्या प्रकारचा कंटेंट तयार करते, मात्र काही लोकांकडून चुकीच्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत.

अभिरामीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलं की, 'मी इथे माझी क्रिएटिव्हिटी आणि वेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करण्यासाठी आले आहे. कपडे काढणे किंवा न्यूड फोटो देणे हा माझा उद्देश नाही.' जर कुणी सब्सक्रिप्शन घेऊन अशी अपेक्षा करत असेल की मी त्यांच्यासाठी अश्लील कंटेंट तयार करेन तर त्यांनी लगेच अनसब्सक्राइब करावं.'

तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून अनेकांनी तिच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. अभिरामीने नुकतंच एक्सक्लुझिव्ह कंटेंटसाठी एक सब्सक्रिप्शन आधारित पेज सुरू केलं आहे.

या प्लॅटफॉर्मवर तिने खास फोटो, क्रिएटिव्ह पोस्ट आणि इतर वेगळा कंटेंट शेअर करते. या सेवेसाठी तिने महिन्याला 399 रुपयांचं सब्सक्रिप्शन ठेवले आहे. माहितीनुसार, आतापर्यंत 700 हून अधिक लोकांनी तिंच पेज सब्सक्राइब केलं आहे. मात्र काही लोकांकडून अश्लील स्वरूपाच्या मागण्या येऊ लागल्याने अभिनेत्री नाराज झाली आहे.