एकाच कथेचे 4 सिनेमे, 2 ब्लॉकबस्टर, 1 सुपरहिट आणि चौथीने मन जिंकले! तुम्ही पाहिलेत का?

दिलीप कुमार यांच्या एका सिनेमाची कथा इतकी हिट ठरली होती की नंतर त्यावर आधारितच चार सिनेमे आले होते. हे सिनेमे देखील सुपरहिट ठरले होते. या सिनेमांमधील तुम्ही कोणता पाहिला आहे?

| Updated on: Jul 08, 2026 | 12:46 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसले. काही चित्रपट तर असे होते ज्यांच्या कथेवर आधारित आणखी काही साधारण सारखे सिनेमे प्रदर्शित झाले. त्याकाळी अभिनेते दिलीप कुमार हे अभिनयाचे गुरू होते. सुपरस्टार अमिताभ बच्चनही त्यांना आदर्श मानतात. १९६१ मध्ये दिलीप कुमार यांनी ‘गंगा जमुना’ ही फिल्म बनवली. या फिल्मने बॉलिवूडला प्रेरणा दिली आणि त्यावर आधारित तीन आणखी फिल्म्स तयार करण्यात आले.

2 / 5

दिलीप कुमार (गंगा) आणि त्यांचे सख्खे भाऊ नासिर हुसैन (जमुना) यांची कथा. वैजयंती माला नायिका. अवधी भाषेतील संवाद, देशभक्तीपर गाणी आणि जबरदस्त अभिनय यामुळे गंगा जमुना १९६१मध्ये प्रदर्शित झालेली ही फिल्म ब्लॉकबस्टर ठरली. ही फिल्म आजही मास्टरपीस मानली जाते.

3 / 5

सलीम-जावेद लिखित, यश चोपडा दिग्दर्शित दीवार हा सिनेमा १९७५ साली प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन (विजय) आणि शशि कपूर (रवि) यांची दोन भावांची कथा. ही फिल्म ब्लॉकबस्टर ठरली आणि हिंदी सिनेमातील iconic चित्रपटांपैकी एक आहे.

4 / 5

1995मध्ये आलेला आंदोलन सिनेमात संजय दत्त आणि गोविंदा मुख्य भूमिकेत होते. दोन भावांची कथा (एक गुन्हेगार, दुसरा सच्चा). ही फिल्म सरासरी (average) राहिली, पण संगीत चांगले होते.

5 / 5

महेश भट्ट दिग्दर्शित, संजय दत्त आणि कुमार गौरव मुख्य भूमिकेत असलेला नाम हा सिनेमा १९८६मध्ये प्रदर्शित झाला. ड्रग तस्कर आणि सच्च्या भावाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली. ही फिल्म सुपरहिट ठरली. त्यामधील गाणे ‘चिट्ठी आई है’ अजूनही लोकप्रिय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us